कलकत्ता, 12 जून : भारत-बांगलादेश बॉर्डर अवैध पद्धतीने पार करण्याचा प्रयत्न करीत असताना एका चीनच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, आपल्या साथीदारांसोबत मिळून तब्बल 1300 भारतीय सीम कार्ड चीनला घेऊन गेला आहे. तस्करी करण्यासाठी तो आपले अंडरगारमेंट्समध्ये हे सीम कार्ड ठेवल होता. सीम कार्ड मिळविण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर केला जात होता. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. सीमा सुरक्षा दलाने चीनच्या हुबेई प्रांतातील निवासी हान जुनवे (35) यांला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याला बीएसएफच्या टीमने गुरुवारी माल्दा जिल्ह्यातून अटक केली होती. कलकत्ता मुख्यालयातील बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरने याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी दिल्यानुसार, जुनवे हा एक गुन्हेगार राहिला आहे.त्याने चौकशीदरम्यान हैराण करणाऱ्या बाबी सांगितल्या. त्याने अवैध कागदपत्रांच्या साहाय्याने तब्बल 1300 भारतीय सीमकार्ड येथून चीनमध्ये नेले आहेत. कशी करीत असे तस्करी? मिळालेल्या माहितीनुसार, ‘जुनवे आपल्या साथीदारांच्या मदतीने अंडरगारमेंटमध्ये सीम लपवती होता. हे सीम चीनमध्ये पाठवले जात होते. सीमच्या मदतीने लोकांना धोका देणे, पैसे उकळणे हा हेतू होता. या मोठ्या गुन्हेगाराची अटक बीएसएफसाठी मोठं यश मानलं जात आहे. हे ही वाचा- नाकात बोट घातलं की अकाऊंट होणार ब्लॉक! चीनने बनवला अजब नियम त्याच्यावर आरोप आहेत की, या सीम कार्डचा वापर बँक खाती हॅक करण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापरली जातात. जुनवे याने अधिकाऱ्यांना सांगितलं की, नुकताच लखनऊच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला व्यवसाय भागीदार सन जिआंग याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला भारतीय व्हिसा मिळू शकला नाही. तो भारत-बांगलादेश सीमेवरुन आपल्या देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. इंटरपोलवरुन ब्लू नोटीस जारी बीएसएफने सांगितलं की, प्रक्रियेनुसार तेव्हापासून जुनवे विरोधात इंटरपोलच्या ब्लू नोटीस जारी करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली होती. कोणा व्यक्तीची ओळख, जागा आणि अपराधासंबंधातील माहिती मिळविण्यासाठी अधिक माहिती एकत्र करण्यासाठी ब्लू नोटीस जारी केली जाते. याबाबत बीएसएफने दावा केला आहे की, जुनवेजवळ मोठ्या प्रमाणात संदिग्ध इलेक्ट्रॉनिक उपकरण सापडले आहेत. चिनी नागरिकांनी तपासकर्त्यांना सांगितलं की, तो यापूर्वी कमीत कमी चार वेळा तरी भारतात आला आहे. दिल्लीजवळी गुडगावमध्ये त्याचं एक हॉटेलही आहे. बीएसएफकडून गुरुवारी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जुनवेने सांगितलं आहे की, तो चुकून भारतात आला होता आणि तो लखनऊ एटीएससमोर आत्मसमर्पण करू इच्छित होता. त्याने सांगितलं की, तो ई-कॉमर्सच्या व्यापासासंबंधात यापूर्वीही भारतात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







