Home /News /videsh /

नाकात बोट घातलं की अकाऊंट होणार ब्लॉक! चीनने बनवला अजब नियम

नाकात बोट घातलं की अकाऊंट होणार ब्लॉक! चीनने बनवला अजब नियम

चीनमध्ये (China) कायदा आणि नियम हे इतर देशांपेक्षा वेगळीच असतात. सध्या सोशल मीडिया वूई चॅटने (WeChat) बनवलेला अजब नियम चर्चेत आला आहे. हा नियम सरकारच्या दबावातून केल्याचं मानलं जात आहे.

    मुंबई, 11 जून : चीनमध्ये (China) कायदा आणि नियम हे इतर देशांपेक्षा वेगळीच असतात. काही दिवसांपूर्वी गलवानमध्ये मारलेल्या गेलेल्या चीनी सैनिकांचं सत्य सांगितलं म्हणून एका लोकप्रिय ब्लॉगरला शिक्षा झाली होती. आता चीनमधील सोशल मीडिया वूई चॅटने (WeChat) बनवलेला अजब नियम चर्चेत आला आहे. या नव्या नियमानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुणाला नाकामध्ये बोटं (Nose Picking and Spanking Ban) तसे केल्यास नियमाचे उल्लंघन केले असे समजून त्या व्यक्तीचे अकाऊंट निलंबित करण्यात येईल. इतकंच नाही तर लहान मुलांना थोबाडीत मारलेला व्हिडीओ किंवा फोटो टाकला तरी त्या व्यक्तीचे अकाऊंट बंद होणार आहे. चीन सरकारच्या दबावामुळे कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. वूई चॅट मेसेजिंग अ‍ॅपची  (Messaging app in China) मुख्य कंपनी टेसेंट होल्डिंग लिमिटेडमध्ये चीनी सरकारची मोठी गुंतवणूक आहे. या अ‍ॅपवर यापूर्वी अश्लिलतेचा प्रसार केल्याचा आरोप झाला होता. बंदीची लिस्ट जाहीर चीनच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने बंदीची यादी (WeChat App published list of common violations) जाहीर केली आहे. यामध्ये 70 वेगवेगळ्या कृतींचा समावेश आहे. या अ‍ॅपचे चीनमध्ये 1 अब्ज पेक्षा जास्त यूझर्स आहेत. हे चीनमधील लोकप्रिय अ‍ॅप आहे. चीनमध्ये फेसबुक, व्हॉटसअप, गूगल, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना बंदी आहे. त्यामुळे चीन नागरिकांसमोर फक्त वूई चॅटचाच पर्याय आहे. नायजेरिया सरकारकडून भारतीय KOO App चं स्वागत, ट्विटरला ठोकला रामराम भारतामध्ये बंदी भारत-चीन यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारानंतर चीनमधील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये वूईचॅटचाही समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वूईचॅटवर त्यांच्या देशावर बंदी घातली होती. या अ‍ॅपच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Social media, World news

    पुढील बातम्या