जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / चिनी सैनिक वापरतात त्या युनिफॉर्मच्या कॉलरमध्ये का लावल्या जातात टोकदार पिना, जाणून घ्या कारण

चिनी सैनिक वापरतात त्या युनिफॉर्मच्या कॉलरमध्ये का लावल्या जातात टोकदार पिना, जाणून घ्या कारण

चिनी सैनिक वापरतात त्या युनिफॉर्मच्या कॉलरमध्ये का लावल्या जातात टोकदार पिना, जाणून घ्या कारण

चीनमधील लष्करी दलाच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांची मान झुकू नये म्हणून गणवेशाच्या कॉलरवर धारदार सुई लावली जाते. तसेच, मागील बाजूस एक लाकडी क्रॉस लावला जात आहे.

    बिजींग, 3 एप्रिल : प्रत्येक देशाची संस्कृती (Culture) जशी वेगळी असते तसंच प्रत्येक देशातील सैनिकांचीही (Soldiers Of The Country) आपली एक वेगळी संस्कृती आणि काही नियम असतात. प्रत्येक देशातील सैनिकांच्या चालण्या-बोलण्याचे, उभं राहण्याचे वेगळे नियम असतात. या नियमांद्वारे सेनेची शिस्त आणि आणि देशाबद्दलचा मान राखला जात असतो. सेनेतील प्रत्येक सैनिकाला या नियमांचं (Rules For Soldiers) पालन करावं लागते. हे नियम प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात. मात्र, चीन हा देश नेहमीच काहीतरी वेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. असेच चिनी सैनिकांच्या युनिफॉर्मच्या (Soldier’s Uniform) बाबतीतही आहे. चीनमध्ये जेव्हा एखादा नवीन सैनिक सैन्यात भरती होतो. तेव्हा त्यांच्या ट्रेनिंगदरम्यान त्याच्या युनिफॉर्मच्या कॉलरमध्ये एक पिन वापरली जाते. ही पिन का वापरली जात असावी? याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चीनमध्ये सैनिकांसाठी एक अजब नियम आहे. चिनी सैनिकांच्या युनिफॉर्मच्या कॉलरमध्ये दोन टोकदार पिना लावल्या जातात (Two Pointed Pins Use To Attach To Chinese soldiers’ collars). आज आम्ही तुम्हाला या पिना का लावल्या जातात याबाबदल माहिती देणार आहोत. याबाबतच सविस्तर वृत्त TV 9 हिंदीने प्रकाशित केलं आहे. कोणत्याही सैनिकाला त्यांच्या देशाच्या लष्कराच्या नियमांचं पालन करावं लागतं. त्यांच्या चालण्या-बोलण्यापासून ते उभं राहण्यापर्यंतच्या सर्व हालचालींकडे त्यांना काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर त्यांना छाती ताणून, मान ताठ ठेऊन आणि हात एकदम सरळ ठेऊन उभं राहावं लागतं. चिनी सैनिकांचंदेखील असंच आहे. यासाठी मान ताठ राहावी म्हणून या पिनांचा वापर केला जातो. चिनी सैनिकांच्या युनिफॉर्मधील शर्टच्या कॉलरमध्ये डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एकेक टोकदार पिन लावलेली असते. या पिनांची टोकं वरच्या बाजूला म्हणजेच मानेकडे असतात. याचा फायदा असा होतो की, सैनिकांनी मान खाली केल्यास त्यांना, किंवा त्यांची मान खाली गेल्यास त्यांना या पिना टोचतात. त्यामुळे सैनिक आपली मान खाली वाकू देत नाहीत. सैनिकांना मान ताठ ठेवण्याच्या सरावासाठी या पिना खूप उपयुक्त ठरतात. 21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेश मात्र, मान ताठ ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा पिनांचा नियम सर्व सैनिकांसाठी नसतो. या पिना केवळ त्या सैनिकांना वापराव्या लागतात जे त्यांची मान ताठ ठेवत नाहीत. अशा सैनिकांना त्यांच्या शरीराच्या हालचालींवर ताबा मिळवणं गरजेचं असतं. या पिनांच्या माध्यमातून असे सैनिक आपली मान ताठ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. देशातील सैनिकांसाठी त्यांचा देश हा सर्वांत महत्त्वाचा आणि तितकाच पूजनीय असतो. त्यामुळे देशाच्या सन्मानाच्या बाबतीत कोणताही सैनिक हलगर्जीपणा करत नाही. चीनमधील सैनिकदेखील अशा कठोर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशाचा सन्मान सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: china
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात