India-China Dispute: भारतच नाही, या 21 देशांसोबत चीनचा सीमा प्रश्न; कोणाविरोधात करणार युद्ध?

India-China Dispute: भारतच नाही, या 21 देशांसोबत चीनचा सीमा प्रश्न; कोणाविरोधात करणार युद्ध?

जाणून घ्या चीनचा कोणत्या देशांसोबत सुरू आहे सीमासंघर्ष...

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : भारत-चीन (India-China Conflict) यांच्यात लडाखमध्ये उद्भवलेल्या सीमा प्रश्नामुळे तणाव आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्यानंतरही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका लष्करी तळाला भेट देऊन सैनिकांना युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिल्याची बामती ग्लोबल टाइम्सने दिली आहे. पण फक्त भारताशीच नाही तर तैवान, जपान, व्हिएतनाम अशा तब्बल 21 देशांशी चीनचा सीमा वाद सुरू आहे. याबद्दलच जाणून घेऊ अधिक माहिती.

भारत-चीन सीमा प्रश्न

भारत-चीन यांची 3,488 किलोमीटर लांब सीमा परस्परांना लागून आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणी चीनने भारताच्या भूमीवर आक्रमण करत ती त्यांची असल्याचा दावा केला आहे. चीननी लडाखमधील 38,000 स्क्वेअर किलोमीटर (अक्साई चीन) जमिनीवर कब्जा केला आहे. ही जमीन भारताला तिबेट-शिनजियांगशी जोडते आणि स्ट्रॅटेजिक दृष्टीनीही खूप महत्त्वाची आहे. चीन अरुणाचल प्रदेशला तिबेटचा भाग मानतो आणि 90,000 स्क्वेअर किलोमीटर भाग आपला असल्याचा दावा करतो. 1959 मध्ये तिबेटमधील उद्रेकानंतर दलाई लामांनी भारतात शरण घेतली, 1962 साली या सीमा वादामुळे चीन-भारत युद्ध झालं आहे. आजही चीन आणि भारत यांच्यात लडाख आणि अरुणाचलमध्ये सीमा प्रश्न आहे.

हे ही वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी चीनने या 8 गोष्टींचा केला अवलंब; आता पाहा बदल

जपान-चीन सीमा प्रश्न

साउथ चीनी समुद्रात चीनचा जपानशी सीमावाद आहे. जपानच्या अख्त्यारित असलेलं सेनकाकू बेट त्यांचं असल्याचा चीन दावा करतो.

उत्तर कोरिया-चीन सीमा प्रश्न

खरं तर उत्तर कोरिया चीनचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत पण बाएकडू पर्वत आणि जियानडाओ भाग आपला असल्याचा चीनचा दावा आहे. ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे संपूर्ण उत्तर कोरियाच चीनचा असल्याचा दावाही चीननी खूप वेळा केला आहे. हे दोन देश नदीमुळे वेगळे झाले असून त्यांची 1416 किलोमीटरची सीमा परस्परांना लागून आहे.

दक्षिण कोरिया-चीन सीमा प्रश्न

ईस्ट चीनी समुद्रात चीनचा दक्षिण चीनशी सीमा वाद आहे. ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे संपूर्ण दक्षिण कोरियाच चीनचा असल्याचा दावाही चीनने केला आहे.

रशिया-चीन सीमा प्रश्न

चीन आणि रशियाची 4300 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. यातील 1 लाख 60 हजार स्क्वेअर किलोमीटरच्या भागावर चीनने दावा केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रशियातलं व्लादिवोस्तोक शहर त्यांच्याच देशात असल्याचं दाखवलं होतं. 1969 मध्ये या देशआंत युद्ध झालं होतं.

नेपाळ-चीन सीमा प्रश्न

चीन-नेपाळ 1,415 किलोमीटरची की सीमा संलग्न आहे. नेपाळच्या उत्तरेतील गुमला, रासुवा, सिंधुपालचौक आणि संखुवासभा हे जिल्हे तिबेटचा भाग असल्याने चीनचा भाग आहेत असा त्यांचा दावा आहे. नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट शिखरही चीनमध्ये येत असल्याचा दावा करून तिथं 5G नेटवर्कचा टॉवर बसवण्याची तयारी चीन करतोय.

भुतान-चीन सीमा प्रश्न

भुटानच्या पूर्वेला असलेल्या सतेंग अभयारण्याच्या जागेवरून त्यांचा चीनशी सीमा वाद आहे. या देशांची 470 किलोमीटरची सीमा संलग्न असून  495 चौरस किमीचा प्रदेश विवादित आहे.

व्हिएतनाम-चीन सीमा प्रश्न

चीन आणि व्हिएतनामची 1300 किमीची सीमा संलग्न आहे. व्हिएतनाम अनेक वर्ष चीनच्या अधिपत्याखाली होता. चीन व्हिएतनाममधील मोठ्या भूभागावर दावा करतो.

ब्रुनेई-चीन सीमा प्रश्न

दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर ब्रुनेईचा अधिकार आहे. यापैकी  स्प्रैटली बेटांवर चीन आपला दावा करतो.

तैवान-चीन सीमा प्रश्न

चीन मँकड्सफील्ड बँक, पार्सल बेटं, स्कारबोरो शोअल, दक्षिण चिनी समुद्रातील स्प्रिटली बेटांसह काही भागांवर चीन दावा करतो.

कझाकस्तान-चीन सीमा प्रश्न

चीनचा शिन जियांग प्रांत आणि कजाकिस्तान यांच्यात 1,700 किमी सीमा संलग्न आहे. चीन आणि रशियामध्ये कझाकस्तानचा बफर झोन म्हणून वापर होतो.

किर्गिजस्तान-चीन सीमा प्रश्न

ऐतिहासिक युद्धातील विजयाचा हवाला देत किर्गिजिस्तानतील मोठ्या भागावर चीन दावा करतो. या देशांत 1,063 किलोमीटरची सीमा संलग्न आहे.

ताजिकिस्तान-चीन सीमा प्रश्न

ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे ताजिकिस्तानातील काही भागावर चीन दावा करतो.

अफगानिस्तान-चीन सीमा प्रश्न

चीन और अफगानिस्तान के बीच 210 किलोमीटर लंबी सीमा है, जो वाखां कॉरिडोर के पास है. 1963 में हुई द्विपक्षीय संधि के बावजूद चीन, अफगानिस्तान के बदख्शां प्रांत (Badakhshan province) में अतिक्रमण करता रहता है.

म्यानमार-चीन सीमा प्रश्न

चीन-म्यानमारमध्ये 1960 च्या करारानुसार 2,185 किलोमीटरची सीमा निश्चित केली आहे. ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे चीन यातील काही भागावर दावा करतो.

लाओस-चीन सीमा प्रश्न

1991 च्या करारानुसार या देशांत 505 किमीची की सीमा आहे. पण ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे चीन इथल्या काही भागावर आपला दावा करतो.

मंगोलिया-चीन सीमा प्रश्न

चीन-मंगोलिया संलग्न सीमा 4677 किमी आहे. ऐतिहासिक पुरव्यांच्या आधारे चीन मंगोलियाच्या जमिनवरही दावा करतो.

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापुर-चीन सीमा प्रश्न

भारतानंतर दक्षिण चिनी समुद्रात चीनचा सर्वाधिक सीमा वाद आहे. इथं इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि सिंगापूरशी त्यांचा सीमा वाद आहे. या समुद्रातील या चार देशांच्या क्षेत्रावर चीन दावा करतो.

Published by: Meenal Gangurde
First published: October 15, 2020, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading