Home /News /india-china /

प्रदूषण रोखण्यासाठी चीनने या 8 गोष्टींचा केला अवलंब; आता पाहा बदल

प्रदूषण रोखण्यासाठी चीनने या 8 गोष्टींचा केला अवलंब; आता पाहा बदल

प्रदूषण रोखण्यासाठी चीनने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : दिल्लीमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रश्न समोर येत असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळं दिल्लीकरांना या समस्येला तोंड द्यावं लागते. पण सरकारने उचललेल्या विविध पावलांमुळं नागरिकांना यावर्षी याचा कमी त्रास होईल असा अंदाज आहे. भारताबरोबरच चीनला देखील अशाच प्रदूषणाचा आणि धुक्याचा फटका दरवर्षी बसत असतो. परंतु यावेळी चीनने यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. या उपायांच्या मदतीने चीनने आपल्या अनेक शहरांमधील प्रदूषणाला आळा घातला आहे. दिल्लीप्रमाणेच चीनमधील अनेक शहरांना या प्रदूषणाचा फटका बसत असतो. या कालावधीत बीजिंगमध्ये प्रत्येक नागरिकाला मास्क घालूनच घराबाहेर पडावे  लागत आहे. 2013 पासून चीनने अनेक प्रयत्न केले असुन विविध विविध उपायांच्या मदतीने प्रदूषणाला आळा घातला आहे. 2012 पर्यंत चीनमध्ये प्रदूषणाची पातळी प्रचंड मोठी होती. चीनमधील 90 टक्के शहरांची  हवेची पातळी घसरली होती. चीनमधील 78 मोठ्या शहरांपैकी केवळ ८ शहरांमधील शुद्ध हवेची पातळी ही नियमित होती. महत्त्वाचं म्हणजे चीनमध्ये प्रदूषणामुळे 5 लाख नगरिकांचा मृत्यू होत होता. यासाठी चीनने 2013 मध्ये नॅशनल अॅक्शन प्लान ऑन एअर पोल्युशन लागू केला. यासाठी सरकारने तब्बल 277 अब्ज डॉलर खर्चदेखील केला होता. त्याचबरोबर या नियम युद्ध पातळीवर लागू करण्याचा देखील निर्णय घेतला होता. चीनने उचललेली 8 महत्त्वाची पावल 1) प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना उत्तर चीन आणि पूर्व चीनमधून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. त्याचबरोबर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांमधून उत्पादन कमी करण्यात आले. 2) देशभरात कोळश्याचा वापर कमी करण्यात आला. 3) जुन्या वाहनांवर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर महत्त्वाच्या बीजिंग, शांघाय  आणि  गुआंगझोऊ सारख्या मोठ्या शहरांमध्ये कारच्या संख्येवर देखील नियंत्रण ठेवण्यात आले. 4) कोळश्यावर आधारित नवीन उद्योगांना परवानगी देण्यात आली नाही.  बीजिंग आणि इतर शहरांपासून लांब कारखाना उभा करण्याचे आदेश देण्यात आले. 5) मोठ्या शहरांमध्ये एयर प्यूरीफायर लावण्याचा निर्णय घेतला. 6) ताज्या हवेसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली. 7) मोठ्या शहरांमध्ये लो कॉर्बन पार्क बनवण्यात आले. यामुळं कार्बनची निर्मिती कमी होण्यास मदत झाली. 8) उदयोगांची संख्या कमी करून कोळश्याच्या खाणींवर देखली बंदी घालण्यात आली. दरम्यान, चीनमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2020 या वर्षात 60 टक्क्यापर्यंत प्रदूषण पातळी कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Pollution

    पुढील बातम्या