धक्कादायक गौप्यस्फोट! चीनकडून तिबेटींवर जुलूम, जबरदस्तीनं सुरू आहे सैन्यभरती

धक्कादायक गौप्यस्फोट! चीनकडून तिबेटींवर जुलूम, जबरदस्तीनं सुरू आहे सैन्यभरती

चीनकडून तिबेटी नागरिकांवर जुलूम आणि जबरदस्ती सुरू (China forcing Tibetians to join army) असल्याचं एका गोपनिय अहवालातून (Secret report) समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : चीनकडून तिबेटी नागरिकांवर जुलूम आणि जबरदस्ती सुरू (China forcing Tibetians to join army) असल्याचं एका गोपनिय अहवालातून (Secret report) समोर आलं आहे. चीनने आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी त्यात तिबेटी नागरिकांना (China appointing Tibetion in military) भरती करायला सुरुवात केली आहे. अनेक तिबेटी तरुणांना चिनी सैन्यात दाखल होण्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीनं त्यांची भरती केली जात असल्याचं समोर आलं आहे.

चीनकडून तिबेटींसाठी वेगळे नियम

तिबेटमधील प्रत्येक कुटुंबातील सदस्याने सैन्यात भरती होण्याचा नियम चीनने केला आहे. त्यामुळे इच्छा असो वा नसो, तिबेटमधील तरुणांना चिनी सैन्यात भरती व्हावं लागत आहे. एका गुप्त रिपोर्टमधून याचा उलगडा झाला आहे. भारताला लागून असलेल्या तिबेटमधील प्रत्येक कुटुंबातील 18 ते 40 वयोगटातील किमान एका व्यक्तीला चिनी सैन्यात भरती होणे अनिवार्य असेल, असा फतवाच चीनने काढला आहे. वास्तविक, वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाला आपलं नाव चीनच्या मिलिटरी सर्व्हिससाठी नोंदवणं बंधनकारक आहे. प्रत्येक तरुणाला सैन्यात भरती होण्याची सक्ती नसली तरी कुटुंबातील एका सदस्याला मात्र इच्छेविना सैन्यात भरती होणं भाग पाडलं जात आहे.

ट्रेनिंगनंतर नियंत्रण रेषेवर नेमणूक

तिबेटी तरुणांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलं जाणार आहे. सध्या तैनात असलेल्या सैनिकांपैकी अनेकजण तिबेटी असल्याचंही समोर आलं आहे. ज्या भागातून दोन्ही देशादरम्यान व्यापार होतो, त्या भागात या सैनिकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.

तिबेटची वेगळी फौज

तिबेटी तरुणांना प्रशिक्षण देऊन चीनने त्यांची वेगळी फळीच तयार केली आहे. याला नाव देण्यात आलं आहे मिमांग चेटोन. तिबेटीयन भाषेत त्याचा अर्थ होतो जनतेसाठी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सैन्याच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे वाचा - आंतरजातीय विवाह योजनेचा गैरफायदा, पैसे मिळवण्यासाठी केलं लग्न

तिबेटींची क्षमताय

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील प्रतिकूल वातावरण चिनी सैनिक टिकाव धरू शकत नाहीत. मात्र तिबेटी नागरिकांना या वातावरणाची सवय असल्यामुळे ते अधिक सक्षमपणे प्रतिकूल वातावरणात काम करू शकतात. चीनकडून याच गोष्टीचा फायदा घेतला जात आहे.

Published by: desk news
First published: September 21, 2021, 7:32 PM IST

ताज्या बातम्या