मराठी बातम्या /बातम्या /india-china /भारतावर चीन करू शकतं Cyber Attack! मोठ्या नुकसानाची भीती- CDS बिपिन रावत

भारतावर चीन करू शकतं Cyber Attack! मोठ्या नुकसानाची भीती- CDS बिपिन रावत

New Delhi: India's first Chief of Defence Staff (CDS) Gen Bipin Rawat interacts with media after inspecting the Guard of Honour at South Block, in New Delhi, Wednesday, Jan 1, 2020. (PTI Photo/Kamal KIshore)   (PTI1_1_2020_000008B)

New Delhi: India's first Chief of Defence Staff (CDS) Gen Bipin Rawat interacts with media after inspecting the Guard of Honour at South Block, in New Delhi, Wednesday, Jan 1, 2020. (PTI Photo/Kamal KIshore) (PTI1_1_2020_000008B)

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Chief of Defense Staff General Bipin Rawat) यांनी अशी माहिती दिली की, चीन भारतापेक्षा तंत्रज्ञानामध्ये (Technology) बराच पुढे आहे आणि हा देश भारतावर सायबर हल्ला (Cyber Attack) करण्यासाठी सक्षम आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 08 एप्रिल: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Chief of Defence Staff General Bipin Rawat) यांनी अशी माहिती दिली की, चीन (China) भारतापेक्षा तंत्रज्ञानामध्ये (Technology) बराच पुढे आहे आणि हा देश भारतावर सायबर हल्ला (Cyber Attack) करण्यासाठी सक्षम आहे. एका कार्यक्रमात जनरल बिपिन रावत यांनी असे म्हटले की, भारत आणि चीनमध्ये जे सर्वात जास्त अंतर आहे ते म्हणजे सायबर डोमेन, मात्र आता भारत आता या दिशेने अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. (China has Capability to Launch Cyber Attacks)

विवेकानंद चरनेशनल फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात जनरल बिपिन रावत यांनी हे मान्य केलं की चीनमध्ये एवढी क्षमता आहे की ते भारतावर सायबर हल्ला करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात आपल्या सिस्टिम्सना नुकसान पोहोचवू शकतात. त्यांनी असे म्हटले की, भारत अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सायबर डिफेन्स सिस्टिमवर काम करत आहे.

जनरल रावत यांनी पुढे असे म्हटले की, भारतातील सायबर संस्था सायबर हल्ल्याविरोधात फायरवॉल्स (Firewalls) बनवत आहेत जेणेकरून आपण हा हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देऊ शकू आणि या हल्ल्यांचा परिणाम दीर्घकालीन राहणार नाही. तीनही दलांच्या एकीकरणातून या हल्ल्यापासून वाचता येईल. काही पाश्चिमात्य देशांचे भारताशी असणारे संबंध अशाप्रकारे हल्ले रोखण्यात मदतीचे ठरू शकतात.

(हे वाचा-तुमचा चेहरा असेल बोर्डिंग पास, पुण्यासह या एअरपोर्टवर येणार Paperless Boarding)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि क्वांटम कंप्यूटिंगबाबत बोलताना त्यांनी असे म्हटले की, याचा उपयोग भविष्यातील देखभाल आणि नौदल अंडरवॉटर डोमेनसाठी केला जात आहे, परंतु या प्रदेशात आपण स्पष्टपणे चीनपेक्षा मागे पडलो आहोत. ते म्हणाले की क्वांटम कंप्यूटिंगमध्ये आपण समाधानकारक प्रगती केलेली नाही, मात्र आता याची सुरुवात झाली आहे.

First published:
top videos

    Tags: India china