World Spine Day: जाणून घ्या मणक्याच्या त्रासाची 3 प्रमुख कारणं; तज्ज्ञांनी सांगितले 'हे' उपाय

World Spine Day: जाणून घ्या मणक्याच्या त्रासाची 3 प्रमुख कारणं; तज्ज्ञांनी सांगितले 'हे' उपाय

पाठीच्या मणक्याचा त्रास कमी होण्यासाठी आणि टाळण्यासाठी डॉ. अग्रवाल यांनी काही उपाय सांगितले आहेत. जर कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासाला 6 मिनिटांचा वॉक घेतला तर मणक्याची हानी टाळता येऊ शकते

  • Share this:

नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : मणका (Spine) हा आपल्या मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्याशिवाय आपण बसू आणि चालू शकत नाही. मणक्याचं महत्त्व जाणून दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड स्पाईन डे (World Spine Day) साजरा केला जातो. पाठीच्या कण्याशी संबंधित रोगांविषयी जागरूकता पसरवणं हे या मागचं उद्दिष्ट आहे. कारण मणक्याचे विकार हे अपंगत्वाचं एक प्रमुख कारण मानलं जातं. त्यात सध्या कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम (Work from Home) मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यामुळे अनेकांना मणक्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत, अशी माहिती मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील कन्सल्टंट स्पाइन सर्जन (Consultant Spine Surgeon) डॉ.विनोद अग्रवाल (एमएस ऑर्थो) (Dr Vinod Agarwal) यांनी दिली. दैनिक भास्कर वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. पबमेड सेंट्रल (PubMed Central) अर्थात पीएमसी लॅबने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनात सुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आलेली आहे. घरून काम करणाऱ्या 41.2 टक्के लोकांना पाठदुखीची समस्या आहे आणि 23.5 टक्के लोकांना मानदुखीची समस्या आहे.

पाठीच्या मणक्याचा त्रास कमी होण्यासाठी आणि टाळण्यासाठी डॉ. अग्रवाल यांनी काही उपाय सांगितले आहेत. जर कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासाला 6 मिनिटांचा वॉक घेतला तर मणक्याची हानी टाळता येऊ शकते. या व्यतिरिक्त, दररोज चाईल्ड पोझ, कॅट आणि काऊ पोझ सारखी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. उपायांबरोबरचं मणकेदुखीची कारणं देखील जाणून घेतली पाहिजेत.

Jaggery Tea Benefits : चहात साखरेऐवजी गूळ वापरण्याचे इतके आहेत फायदे, वाचा सर्व

मणकेदुखीची 3 प्रमुख कारणं -

एकाचं जागी खूप वेळ बसून राहणं

स्पाइन युनिव्हर्स (Spine Universe) च्या निरीक्षणानुसार, बराच वेळ एकाजागी बसल्यानं ग्लूटस मॅक्सिमसमध्ये (Gluteus Maximus) रक्त प्रवाहावर परिणाम होतो. ग्लूटस हा मणक्याला आधार देणारा मुख्य स्नायू आहे.

चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे

बसल्याजागी खाली वाकल्यामुळे आणि वळल्यामुळे मणक्यातील लिगामेंट (ligament)आणि डिस्कवर (Disc) ताण वाढतो. यामुळे खांदे, मान आणि पाठीत वेदना सुरू होतात. अशा बॉडी पोश्चरला पुअर पोश्चर सिंड्रोम (Poor Posture Syndrome) म्हणतात.

मोबाइल अॅडिक्शन

जेव्हा आपण बराच वेळ मोबाईल हाताळतो तेव्हा स्क्रीन पाहण्यासाठी वारंवार खाली वाकतो. तेव्हा पाठीच्या कण्यावर ताण येतो. परिणामी आपल्या मणक्याची डिस्क श्रींक (Shrink) होते. PubMed.gov नुसार, मणक्याच्या मजबुतीसाठी पाठ आणि पाठीच्या स्नायूंमध्ये बळ असणं खूप महत्वाचं आहे. हे स्नायू पाठीचा कणा संतुलित आणि मजबूत करतात. हे स्नायू जितके मजबूत असतील तितका मणक्यावर पडणाऱ्या वजनाचा दबाव कमी होतो.

NonVeg खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मटन-मांस खाल्ल्यानंतर अ‌ॅलर्जीचा धोका

मणके मजबूत करण्यासाठी तीन उपाय

वॉक करा

टीव्ही पाहताना मध्ये-मध्ये थोड्या वेगात चालण्याचा सल्ला डॉ. अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे स्नायूंची ताठरता कमी होते आणि लवचिकता वाढते.

चाईल्ड पोज योगासन

मणक्याच्या दुखण्यावर चाईल्ड पोज योगासन फायदेशीर ठरतं. पायाच्या बोटांवर बसून हाताचे तळवे लहानमुलाप्रमाणं जमिनीवर ठेवा. त्यानंतर हळूहळू श्वास घेत एक ते दोन मिनिटं त्याच स्थितीत रहा. पुन्हा श्वास घेत आधीच्या स्थितीत या. याचंप्रमाणं काऊ आणि कॅट पोझ योगासनं देखील फायदेशीर ठरतात. या योगासनांमुळं शरीर आणि मणक्यातील रक्त प्रवाह सुधारतो, मांड्या, हिप्स आणि घोट्यांना बळकटी येते. मणक्याचे स्नायू देखील मजबूत होतात.

ब्रिज एक्सरसाइज

ब्रिज एक्सरसाइज करण्यासाठी जमिनीवर झोपा, पायाच्या तळव्यांवर जोर देऊन आपला पार्श्वभाग उचलून एका रेषेत आणा. 10 ते 15 सेकंद त्याच स्थितीत रहा. ही कृती 15 मिनिटांसाठी तीनदा करा. प्रत्येक सेट दरम्यान एक मिनिटाचं अंतर ठेवा. यामुळे हिप्सचे स्नायू मजबूत होतात. आपले हिप्स पाठीच्या खालच्या भागाला आधार देतात आणि पाठीचा कणा मजबूत करतात.

First published: October 16, 2021, 1:45 PM IST

ताज्या बातम्या