मराठी बातम्या /बातम्या /heatlh /World Menopause Day : चाळीशीऐवजी तिशीतच मेनोपॉज; डॉक्टरांकडून ऐका याची कारणं, परिणाम; पाहा VIDEO

World Menopause Day : चाळीशीऐवजी तिशीतच मेनोपॉज; डॉक्टरांकडून ऐका याची कारणं, परिणाम; पाहा VIDEO

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती येण्याचं वय कमी होऊ लागलं आहे, याबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 ऑक्टोबर : मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे मासिक पाळी नाही आली तर किंवा बंद झाली तर किती बरं होईल, असं काही महिलांना कधी ना कधी तरी वाटलं असेल. मासिक पाळी बंद होण्याचा काळ म्हणजे रजोनिवृत्ती. जी वयाच्या चाळीशीच्या टप्प्यात येते. पण आता वयाच्या चाळीशीत येणारी रजोनिवृत्ती वयाच्या तिशीतच येऊ लागली आहे. तसं मासिक पाळीच्या समस्येतून सुटका म्हणून काहींना हा दिलासा वाटेल पण डॉक्टरांनी मात्र कमी वयात रजोनिवृत्ती येणं घातक असल्याचं म्हटलं आहे.

आज जागतिक रजोनिवृत्ती दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील लिलावती हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याबाबत मार्गदर्शन केलं आहे. कमी वयात येणाऱ्या रजोनिवृत्तीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याची कारणं काय, त्याचे परिणाम काय आणि त्याला कसा प्रतिबंध करता येऊ शकतो, याचा उपायही त्यांनी सांगितला आहे.

हे वाचा - World Menopause Day : मेनोपॉज सुरु झालाय हे कसं ओळखायचं? शरीरात कोणते बदल होतात?

डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, रजोनिवृत्ती येण्याचं सामान्य वय 40 ते 50 वर्षे आहे. पण माझ्या पाहण्यात सध्या 30 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये पॅरोमेनोपॉज दिसून येतो आहे. त्यांच्यातील स्त्रीबीजं कमी होत आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांत ही बाब जास्त आढळून येत आहेत.

यामागे प्रदूषण, ताण अशी वेगवेगेळी कारणं आहेत. पण हे घातक ठरू शकतं. यामुळे हॉट फ्लॅशेस, इन्सोमेनिया, मानसिक समस्या उद्भवते. बोन डेन्स्टिटी म्हणजे हाडांची घनता कमी होणं अशी लक्षणं दिसतात. सर्वात चिंताजनक परिणाम म्हणजे प्रजननक्षमता कमी होते आणि  मुलं होण्यात अडथळा होतो.

हे वाचा - Food For Healthy Ovaries : हे पदार्थ खाल्ल्याने स्ट्राँग आणि हेल्दी बनेल ओव्हरीज; प्रेग्नन्सीतही समस्या येणार नाही

कमी वयात येणारा मेनोपॉज टाळता येऊ शकतो. आता प्रदूषणाला तर आपण काही करू शकत नाही. पण आपल्या जीवनशैलीचा होणारा हा परिणाम आहे, त्यामुळे जीवनशैली बदलणं तर आपल्या हातात आहे. वेळेवर झोपा, पौष्टिक खा, एक्सरसाइझ करा, हार्मोनल अनियंत्रित असतील तर त्यावर उपचार करून घ्या,  मेडिटेशन करा, ज्या गोष्टी आवडतात त्या करा, छंद जोपासा. सर्वात महत्त्वाचं हल्ली बऱ्याच महिला स्मोकिंग करतात, त्याचाही हा परिणाम आहे. त्यामुळे सर्वात आधी धूम्रपान थांबवा.

आधी लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत असतं. महिला आपसात व्यस्त असायच्या. आता करिअर किंवा इतर अनेक कारणांमुळे महिला एकाकी आहेत. त्याचा हा परिणाम आहे. तसं प्रत्येक गोष्ट वेळेवर होणं गरजेचं आहे. पण करिअरमध्ये मूल होण्यास विलंब केला जातो. पण अशावेळी तुम्ही तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता. बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहे, असा सल्लाही डॉ. पानशेतकर यांनी दिला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, On this Day, Periods, Woman