मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कोरोना लशीने केली कमाल! प्रेग्नन्सीमध्ये आईचं लसीकरण; अँटीबॉडीज घेऊनच जन्माला आलं बाळ

कोरोना लशीने केली कमाल! प्रेग्नन्सीमध्ये आईचं लसीकरण; अँटीबॉडीज घेऊनच जन्माला आलं बाळ

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

आईने लस घेतल्यानंतर बाळामध्ये अँटिबॉडीज (Baby born with corona antibodies) तयार होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

वॉशिंग्टन, 18 मार्च : भारतात सध्या तरी प्रेग्नंट महिलांना कोरोनाची लस (Corona vaccine during pregnancy) दिली जात नाही आहे. मात्र यूएसमध्ये एका महिलेनं प्रेग्नन्सीत कोरोना लस (pregnant woman taken covid 19 vaccine) घेतली आणि त्यानंतर तिला झालेल्या बाळामध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडीज (Baby born with corona antibodies) तयार झाल्या आहेत. असं पहिलंच प्रकरण समोर आलं आहे, त्यामुळे आता लशीच्या शस्त्रासह कोरोनाविरोधातील लढाई लढायला अधिक बळ मिळालं आहे.

यूएसमधील एका महिलेनं प्रेग्नन्सीच्या 36 व्या आठवड्यात या महिलेनं मॉडर्ना कोरोना लशीचा पहिला डोस घेतला तीन आठवड्यांनंतर तिनं एका निरोगी बाळाला जन्म झालं. तिला मुलगी झाली. जन्मानंतर लगेच तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यावेळी तिच्या रक्तात कोरोनाव्हायरसविरोधात (SARS-CoV-2) अँटिबॉडीज असल्याचं दिसून आलं. हे प्रकरण medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे वाचा - Corona Vaccine side Effects : लस घेतल्यानंतर काय होतं? लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

आईला लस दिल्यानंतर बाळाच्या शरीरात अँटिबॉडीज आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे, असं  यूएसच्या फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीतील अभ्यासक पॉल गिलबर्ट आणि चॅड रूडनिक यांनी सांगितलं. यानंतर ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या या महिलेला लसीकरण नियमानुसार 28 दिवसांनी कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यात आला, असं डॉक्टरांनी सांगितलं.

याआधी झालेल्या अभ्यासांनुसार कोरोनामुक्त झालेल्या आईच्या शरीरातील अँटिबॉडीज प्लेसेंटामार्फत तिच्या गर्भापर्यंत जाणं अपेक्षेपेक्षा कमीच आहे. पण नव्या अभ्यासानुसार आईच्या लसीकरणानंतर बाळाला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो आणि सुरक्षा देता येऊ शकते. पण यासाठी आता अधिक अभ्यासाची गरज असल्याचंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - ब्लूट्यूथने फोनमध्ये पसरतो हा खास व्हायरस; Coronavirus ट्रॅक करण्यासाठी होते मदत

आईच्या लसीकरणानंतर बाळाला मिळणारं संरक्षण किती प्रभावी आहे आणि किती काळ टिकू शकतं हे अद्याप माहिती नाही, असं बालरोग तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रेग्नंट आणि ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिला आणि त्यांना होणाऱ्या बाळांवर लशीचा काय प्रभाव होतो आणि ती किती सुरक्षित आहे याबाबत अधिकाअधिक अभ्यास व्हावा असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Health, Mother, Pregnancy, Pregnant, Sars-cov-2, Wellness