मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये का लावले जातात टाके, ते किती दिवसांत ठीक होतात?

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये का लावले जातात टाके, ते किती दिवसांत ठीक होतात?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जर तुमचीही प्रसूती होणार असेल किंवा तुम्ही आई होण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २५ नोव्हेंबर : आई होणं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. काही महिलांना लग्नानंतर लगेच मुल हवं असतं तर काही महिलांना काही वर्षानंतर मुलं हवं असतं. ही भावना प्रत्येक स्त्रीला जपायची असते. तसेच गरोदर काळ देखील प्रत्येक महिलेसाठी एक वेगळा आणि सुखद अनुभव घेऊन येतो. नऊ महिन्यानंतर जेव्हा आई बाळाला जन्म देते. तेव्हा ही प्रसुती दोन प्रकारे होते. एक म्हणजे नॉर्मल आणि दुसरी म्हणजे सिजेरियन.

यामध्ये सिजेरियन म्हणजे पोट फाडून त्यामधून बाळाला काढलं जातं. जेव्हा क्रिटीकल परिस्थीती असते, तेव्हा बाळाचे, तसेच आईचे प्राण वाचवण्यासाठी असा निर्णय घेतला जातो. ज्यामध्ये बाळ काढल्यानंतर पुन्हा टाके घातले जातात.

नॉर्मल डिलिव्हरीबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी देखील महिलांच्या योनीची जागा फाडली जाते आणि त्यांना टाके दिले जातात. पण असं का? दोन्ही वेळेला टाके दिले जातात. मग या दोघांमध्ये फरक तरी काय? असा अनेकांना प्रश्न पडतो.

हे ही पाहा : महिलांनी 'या' गोष्टी Gynecologist पासून लपवणं ठरु शकतं धोक्याचं

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये हे टाके घातल्यानंतर काही आठवड्यांनी ही जखम बरी होते आणि हे टाके स्वतःच विरघळतात. पण टाक्यांमुळे वेदना होऊ शकतात आणि संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल.

खरंतर नॉर्मल डिलिव्हरीदरम्यान, योनी आणि तुमच्या संडासची जागा या दरम्यानचा भाग बर् यापैकी ताणला जातो. ज्यामुळे तेथील जागा फाटली जाते किंवा घर्षण होऊन ती जासा सोलल्या सारखी होते. अशावेळी जेव्हा महिलेला प्रसुतीकळा येतात किंवा बाळ बाहेर येत असतं तेव्हा बरेच डॉक्टर ती जागा कापतात. ज्यामुळे बाळ सहज बाहेर येईल.

या कटला एपिसिओटोमी म्हणतात. पण कधी कधी हे टाके लावण्याची गरज देखील भासत नाही.

कधी कधी जागा कमी फाटल्यामुळे किंवा कमी ताणामुळे फक्त त्वचेचं थर निघतो. त्यामुळे तेथे जखम तर होते. पण त्याला टाके लावले जात नाहीत. यालाच प्रथम पदवी स्तर असे म्हणतात. जर तुमची एपिसिओटोमी केलेली नसेल, तर ती एक चांगली गोष्ट आहे.

जर तुमचीही प्रसूती होणार असेल किंवा तुम्ही आई होण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.

हे टाके केव्हा बरे होतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे टाके सहसा प्रसूतीनंतर दोन आठवड्यांच्या आत स्वतःच विरघळतात, परंतु जखम पूर्णपणे बरी होण्यास जास्त वेळ लागतो. आपली जखम किती लवकर बरी होते हे आपल्या अप्सिओटोमीचा कट किती खोल होता यावर अवलंबून आहे.

हे सामान्यत: दोन ते तीन आठवड्यांत बरे होतात. तर काही स्त्रियांना एक किंवा दोन महिने वेदना आणि अस्वस्थता जाणवते.

जर स्तर खोल असेल तर?

जर एपिसिओटोमी कटखोल असेल आणि तो तुमच्या संडासाच्या जागेपर्यंत पोहोचला असेल, तर आपल्याला दीर्घकाळापर्यंत वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते.

प्रसूतीनंतर पहिल्या काही दिवसांत लघवी आणि संडास होण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे बऱ्याचदा महिलांना गॅसच्या समस्या उद्भवतात.

First published:

Tags: Health Tips, Pregnent women, Women