मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

‘एंझायटी अ‍ॅटॅक’ का येतो?; जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार

‘एंझायटी अ‍ॅटॅक’ का येतो?; जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार

 Anxiety

Anxiety

एखाद्या व्यक्तीला जीवनाबद्दल निराशा आणि भीतीची भावना असल्यामुळे चिंता किंवा अस्वस्थता होते. याशिवाय तणाव, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉलमुळेदेखील एंग्झायटी म्हणजे सतत चिंता वाटू शकते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीला जीवनाबद्दल निराशा आणि भीतीची भावना असल्यामुळे चिंता किंवा अस्वस्थता होते. याशिवाय तणाव, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉलमुळेदेखील एंग्झायटी म्हणजे सतत चिंता वाटू शकते. अशा परिस्थितीत आपल्या आयुष्यात खूप वाईट घडणार आहे, अशी भीती संबंधिताला वाटू लागते. याच गोंधळात ती व्यक्ती नेहमी काळजीत आणि घाबरलेली असते. कधीकधी भीती इतकी वाढते, की ‘एंझायटी अ‍ॅटॅक’ येतो. यामध्ये खूप चिंता, अस्वस्थता, शरीर थरथर कापणं, घाम येणं हे सर्व एकाच वेळी होऊ लागतं. त्यामुळे ती व्यक्ती शांत होऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे हा आजार गंभीर आहे, एवढं मात्र नक्की. आज आपण या आजाराची कारणं, लक्षणं आणि त्यावरील उपचार याबद्दल जाणून घेणार आहोत.

एंझायटीची कारणं

मेडिकल टुडे न्यूजनुसार, एंझायटीची अनेक कारणं असू शकतात. परीक्षा, नोकरी, आर्थिक, रिलेशनशिप, घटस्फोट इत्यादींचा ताण, एखाद्या गोष्टीची चिंता, अपेक्षेप्रमाणे परिस्थिती न बदलण्याची चिंता, मानसिक सक्रियतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणं, काही आजारांवरील उपचार, काही जुनाट आजार इत्यादींमुळे एंझायटी येऊ शकते.

हेही वाचा - Antibiotics Side Effect : सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या 'या' औषधांमुळे बहिरे होण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

एंझायटीची लक्षणं

एंझायटी असलेली व्यक्ती कायम घाबरलेली असते, ती कधीही शांत नसते. मनात काहीतरी वाईट होण्याची आणि भीतीची भावना कायम असते. इतरांकडून आश्वासनांची खूप अपेक्षा असते. मूड खूप खराब राहतो. ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जगते आणि भविष्यात काय होणार याची चिंता सतावत असते. जेव्हा ही सर्व लक्षणं खूप गंभीर होतात, तेव्हा एक ‘एंझायटी अ‍ॅटॅक’ येतो. यामध्ये पॅनिक अ‍ॅटॅकही असू शकतो. या स्थितीत शरीराला खूप घाम येतो. माणूस खूप वेळ घाबरलेला असतो, चिंता वाढू लागते आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि गुदमरल्यासारखं वाटू शकतं. एंझायटी अ‍ॅटॅकमध्ये हृदयाचे ठोके वाढतात आणि छातीत काहीतरी अकडल्यासारखं वाटतं.

एंझायटीवरील उपचार

एंझायटी अ‍ॅटॅक आल्यास रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. या शिवाय लाईफस्टाइलमध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि दररोज व्यायाम करणंदेखील आवश्यक आहे. तसंच मद्यपान आणि धुम्रपान करू नये. हेल्दी डाएट घेतल्यास ते शरीरासाठी उत्तम राहील. एंझायटी अ‍ॅटॅक वारंवार येत असतील तर डॉक्टर यासाठी सायकोथेरेपी वापरतात. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरेपी आणि काही औषधं वापरली जातात. महत्त्वाचं म्हणजे एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी रात्रीची 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle