मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Booster Dose न घेतल्यानं वाढतोय कोविडचा धोका, ‘ही’ आहे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

Booster Dose न घेतल्यानं वाढतोय कोविडचा धोका, ‘ही’ आहे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

Booster Dose न घेतल्यानं वाढतोय कोविडचा धोका, ‘ही’ आहे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

Booster Dose न घेतल्यानं वाढतोय कोविडचा धोका, ‘ही’ आहे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

Booster Dose benefits: कोरोनाचा बूस्टर डोस घेणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतंच केलं. तसंच बूस्टर डोस न घेणाऱ्या बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 ऑगस्ट: भारतात कोरानाचा (Covid-19) शिरकाव झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रचंड नुकसान झालं. अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना आरोग्याशी निगडीत अनेक समस्या आजही जाणवत आहेत. कोरोना हद्दपार झाला असं समजून बहुतांश जण निर्बंध पाळण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु आजही त्याचा धोका कमी झालेला नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे यापासून वाचायचं असल्यास बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा बूस्टर डोस घेणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतंच केलं. तसंच बूस्टर डोस न घेणाऱ्या बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळे बूस्टर डोस (Booster Dose) म्हणजे काय आहे, तो घेण्याची किती गरज आहे आणि त्यापासून काय फायदा होईल या सर्व बाबी समजून घेण्याची सध्या आवश्यकता निर्माण झाली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल- बूस्टर डोस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो कोरोना लसीप्रमाणेच आहे. कोरोनाची ही तिसरी लस आहे. खबरदारी म्हणून ती घेणं गरजेचं आहे. बूस्टर डोस घेतल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची कुठलीही व्यक्ती हा डोस घेऊ शकते. कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेता येऊ शकतो. हेही वाचा- Health Tips: कोलेस्ट्रॉल कमी झालं तर ब्रेन ब्लीडिंगसोबत 'या' आजाराचा धोका चौथ्या लाटेत राहाल सुरक्षित- कोरोना नष्ट झाल्याचं मानून सगळेच आता निर्बंधमुक्त वावरत आहेत. पण वास्तवात कोरोनाचे नवनवीन प्रकार (Variant) येत आहेत. अनेक रुग्णांमध्ये तर डोस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्या परिस्थितीत बूस्टर डोस घेणं अत्यंत आवश्यक झालय. कुठे घेता येईल बूस्टर डोस- कोरोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस घेता येऊ शकतो. अनेक राज्यांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. https://www.cowin.gov.in/ या वेबसाइटवर नोंदणी करूनही बूस्टर डोस घेता येऊ शकतो. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर लस उपलब्ध झाली आणि कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला. भारतात लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या तुलनेत खूप कमी होती. आता चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना बूस्टर डोसचं सुरक्षा कवच सर्वांसाठी आवश्यक असल्याचं मानलं जातंय.
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Vaccination

    पुढील बातम्या