जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / चायनीज पदार्थांमध्ये वापरणारे अजिनोमोटो आहे तरी काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

चायनीज पदार्थांमध्ये वापरणारे अजिनोमोटो आहे तरी काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

या अजिनोमोटोमुळेच चायनीज पदार्थांची चव वाढते आणि ते अन्य पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे बनतात असं म्हटलं जातं. हे अजिनोमोटो नेमकं आहे काय?

या अजिनोमोटोमुळेच चायनीज पदार्थांची चव वाढते आणि ते अन्य पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे बनतात असं म्हटलं जातं. हे अजिनोमोटो नेमकं आहे काय?

या अजिनोमोटोमुळेच चायनीज पदार्थांची चव वाढते आणि ते अन्य पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे बनतात असं म्हटलं जातं. हे अजिनोमोटो नेमकं आहे काय?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 11 डिसेंबर : अनेकांना चायनीज (Chinese Food) खाद्यपदार्थ खायला आवडतात. काहींना तर चायनीज फूड इतकं आवडतं की ते रोजही खायला तयार असतात. लहान मुलांनाही याची चव विशेष आवडते. याचं कारण म्हणजे, चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो (Ajinomoto) घातलं जातं. या अजिनोमोटोमुळेच चायनीज पदार्थांची चव वाढते आणि ते अन्य पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे बनतात असं म्हटलं जातं. हे अजिनोमोटो नेमकं काय आहे आणि त्यात काय विशेष आहे. भारतात खवय्यांची (Indian Foodie) कमतरता नाही. अनेक गोष्टींमधली विविधता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणजे खाण्याच्या बाबतीतही दिसतं. चमचमीत खायला भारतीयांना फार आवडतं. त्यात स्ट्रीट फूड (Street Food) आणि चाट आयटम्स तर अगदी विशेष आवडीचे; पण तरुणाईची विशेष पसंती मात्र चायनीज पदार्थांना आहे. नूडल्स, मन्चुरिअन, फ्राइड राइस आणि विविध प्रकारचे चायनीज खाद्यपदार्थ तरुणाईला आवडते. चायनीज पदार्थ लोकप्रिय होण्यामध्ये अजिनोमोटो महत्त्वाचं आहे. अगदी अलीकडच्या काळात भारतात अजिनोमोटोबद्दल माहिती झालं असलं, तरी त्यातले पदार्थ मात्र भारतीयांसाठी नवीन नाहीत. अजिनोमोटोमध्ये ग्लुटॅमिक ॲसिड असतं. टोमॅटो, कांदा, मका, मश्रूम, मासे यांमध्येही ग्लुटॅमिक ॲसिड असतं, असे वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने  दिले आहे. 48 वर्षांच्या Malaika Arora ने केलं असं Bold फोटोशूट, की… उसाची मळी किंवा बिटाच्या मळीमध्ये अमोनियम सॉल्ट वगैरे एकत्र करून अजिनोमोटो बनवलं जातं. अजिनोमोटो नेहमी खाल्ल्यास त्यामुळे त्रासही होऊ शकतो, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. अजिनोमोटोला चायनीज सॉल्टही म्हटलं जातं. त्याचं मूळ नाव मोनो सोडिअम ग्लुटामेट असं आहे. गंमत म्हणजे अजिनोमोटो हे कोणत्याही पदार्थाचं नाव नाही, तर जी कंपनी हे बनवते तिचं नाव अजिनोमो आहे; पण अजिनोमोटो या नावानंच हा पदार्थ प्रसिद्ध आहे. याचा वापर चायनीज पदार्थांमध्येच जास्त केला जातो. याची चव एरव्हीच्या सर्वसामान्य मिठापेक्षा अगदी वेगळी असते. पृथ्वीच्या जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या एका महाकाय ‘कवचा’चा शोध! सहसा आपल्याला गोड, आंबट, तुरट, खारट, कडू, तिखट या चवी माहिती आहेत; पण अजिनोमोटोची चव मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या चवीमुळेच तर चायनीज पदार्थांना खास अशी चव मिळते. घरी अगदी सगळं तसंच साहित्य वापरून चायनीज डिशेस केल्या तरी त्याला बाहेर मिळणाऱ्या चायनीज पदार्थांची चव येत नाही. आपल्याकडे अगदी रेस्टॉरंटपासून ते साध्या स्टॉलवर मिळणाऱ्या चायनीजची चव अगदी खास वेगळीच लागते. अर्थातच त्यामागचं सिक्रेट आता तुम्हाला कळलं असेल, ते आहे अजिनोमोटो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात