लंडन, 10 फेब्रुवारी : लठ्ठपणा आणि वाढतं वजन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. वजन आणि लठ्ठपणा कमी कऱण्यासाठी लोक काय काय नाही करत. कुणी डाएट करतं, कुणी एक्सरसाइझ करतं, कुणी वेगवेगळी औषधं घेतं. पण काही जणांचं तर इतकं प्रयत्न करूनही त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही. पण आता वजन, लठ्ठपणा कमी करण्याचा सोपा मार्ग सापडला आहे (Injection for obesity). फक्त इंजेक्शन घेऊनच या समस्येपासून सुटका मिळणार आहे (Weight loss injection).
यूकेमध्ये वजन कमी करणारं इंजेक्शन तयार करण्यात आलं आहे. Semaglutide असं या इंजेक्शनचं नाव आहे. यामुळे लठ्ठपणा कमी होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. रिपोर्टनुसार या इंजेक्शनच्या वापराला ड्रग्स रेगुलेटर नेशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ अँड केयर एक्सिलेन्सने (NICE) मंजुरी दिली आहे. सध्या हे इंजेक्शन टाइप-२ डायबेटिज (Type 2 Diabetes) रुग्णांना दिलं जातं आहे. आता ब्रिटनमध्ये दर आठवड्याला लठ्ठ व्यक्तींना हे इंजेक्शन देण्याची तयारी सुरू आहे.
हे वाचा - Alert! कोरोनासोबत आणखी एका व्हायरसचा 'ताप'; 'त्या' आजाराने पुन्हा डोकं वर काढलं
Novo Nordisk या औषध कंपनीने या औषधाच्या परिणामाचा अभ्यास केला. लठ्ठपणाची शिकार झालेल्या 18 ते 65 वयोगटातील 72 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना दर आठवड्याला हे इंजेक्शन देण्यात आलं. त्यांचं डाएट कमी झालं आणि नंतर वजनही घटल्याचं दिसलं. जर हेल्दी डाएट आणि एक्सरसाइझसोबत हे इंजेक्शन दिलं तर 68 आठवड्यात सरासरी 12% वजन कमी होतं, असं ट्रायलमध्ये दिसून आलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्यांना इंजेक्शन देण्यात आलं त्यांचं वजन वर्षभरात सरासरी 16 किलो कमी झालं. तर ज्यांना प्लासबो देण्यात आलं त्यांचं वजन सरासरी 3 किलो कमी झालं.
या इंजेक्शन Glucagon-Like Peptide-1 (GLP-1) या हार्मोनचं काम करतं, जे खाल्ल्यानंतर रिलीज होतं. यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे लोक कमी खातात. परिणामी वजन आपोआप कमी होतं.
हे वाचा - 'या' समस्या आहेत तर खा पाणीपुरी! अगदी लठ्ठपणा आणि तोंड येण्यावरही आहे फायदेशीर
ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 35 पेक्षा जास्त आहे, त्यांना हे इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 30 ते 35 वयोगटातील लोक ज्यांना डायबेटिज आहे, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने हे इंजेक्शन घेऊ शकतात. तसंच हे इंजेक्शन घेणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंजेक्शन घेणं बंद करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. माहितीनुसार या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत जवळपास 73 युरो म्हणजे साडेसहा हजार रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Obesity, Weight, Weight loss