मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Tom Stolman आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; जाणून घ्या त्याचा डाएट प्लॅन

Tom Stolman आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; जाणून घ्या त्याचा डाएट प्लॅन

वजन वाढवणं किंवा कमी करणं हे किती कष्टाचं काम असतं ते तुम्हाला माहिती असेलच. बॉडीबिल्डर्स कित्येक महिने जिममध्ये मेहनत करून आपलं वजन नियंत्रणात ठेवत असतात.

वजन वाढवणं किंवा कमी करणं हे किती कष्टाचं काम असतं ते तुम्हाला माहिती असेलच. बॉडीबिल्डर्स कित्येक महिने जिममध्ये मेहनत करून आपलं वजन नियंत्रणात ठेवत असतात.

वजन वाढवणं किंवा कमी करणं हे किती कष्टाचं काम असतं ते तुम्हाला माहिती असेलच. बॉडीबिल्डर्स कित्येक महिने जिममध्ये मेहनत करून आपलं वजन नियंत्रणात ठेवत असतात.

  मुंबई, 22 जुलै-  वजन वाढवणं किंवा कमी करणं हे किती कष्टाचं काम असतं ते तुम्हाला माहिती असेलच. बॉडीबिल्डर्स कित्येक महिने जिममध्ये मेहनत करून आपलं वजन नियंत्रणात ठेवत असतात. मात्र, जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती ठरलेल्या टॉम स्टोल्टमनने अवघ्या एका आठवड्यातच तब्बल 14 किलो वजन वाढवलं होतं. एका स्पर्धेच्या वेळी त्याने ही कामगिरी केली. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.टॉम स्टोल्टमन हा दोन वेळा जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती ठरला आहे. यापूर्वी एकदा वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट मॅन ही स्पर्धा जिंकलेल्या टॉमने या वर्षी पुन्हा या स्पर्धेत भाग घेतला होता. 24 ते 29 मे दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेवेळी त्याने एकाच आठवड्यात तब्बल 14 किलो वजन वाढवलं होतं. बिझनेस इनसायडर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत टॉमने आपला डाएट प्लॅनजाहीर केला.

  एकाच आठवड्यात वाढवलं 14 किलो वजन

  180 किलो वजन असणारा टॉम एरव्ही आपलं वजन कायम ठेवण्यासाठी दररोज सुमारे 8000 कॅलरी खातो. मात्र, स्पर्धेच्यावेळी त्याने दररोज तब्बल 15000 कॅलरीज असणारे पदार्थ खाल्ले. 15 हजार कॅलरीज म्हणजे जवळपास आठ लोकांचे एका वेळेचं जेवण होईल एवढं अन्न. मूळचा स्कॉटलंडचा असणाऱ्या टॉमने सांगितलं, की यासाठी त्याला विशेष काही करावं लागलं नाही. कारण यूकेच्या तुलनेत अमेरिकेतील सर्व्हिंग साईज  जास्त असते. त्यामुळे एकाचवेळी भरपूर कॅलरीज खाल्ल्या जातात. “अमेरिकेत एका वेळेच्या जेवणात बीबीक्यू सॉस, केचअप, चीज बर्गर आणि चॉकलेट मिल्कशेक एवढं देतात. या सगळ्या पदार्थांमध्ये मिळून सुमारे 1,721 कॅलरीज असतात. हेच पदार्थ यूकेमध्ये खाल्ले तर त्यात 1,369 कॅलरीज असतील. म्हणजेच, जर मी अमेरिकेत सहा वेळा जेवण केलं, तर तेवढ्याच कॅलरीज मिळवण्यासाठी मला यूकेमध्ये 10 ते 11 वेळा जेवण करावं लागेल.” असं टॉमने सांगितलं.

  स्टॉलमनने सांगितलं, की त्याने स्पर्धेवेळी मुद्दाम वजन वाढवलं नव्हतं. सहा दिवसांच्या या स्पर्धेवेळी त्याची एनर्जी कायम रहावी यासाठी खास डाएट प्लॅन डिझाईन करण्यात आला होता. कारण स्पर्धेमध्ये वजन उचलून, किंवा इतर टास्ट करुन त्याच्या बऱ्याच कॅलरीज बर्न होत होत्या. त्याच्या डाएटमध्ये भरपूर प्रोसेस्ड फूड सामाविष्ट होतं. यामुळे त्याचं वजन एवढ्या झपाट्याने वाढलं. यामुळे त्याचं वजन 180 किलोंहून अधिक झालं होतं. मात्र, या वाढलेल्या वजनाचा त्याला स्पर्धेमध्ये फायदा झाला.

  (हे वाचा:फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं, वजन घटण्यास होईल सुरुवात )

  असा होता डाएट प्लॅन

  टॉम सकाळच्या नाश्त्यामध्ये स्ट्रॉबेरी, केळी आणि मधाचे पॅनकेक खायचा. त्यानंतर दुपारच्या जेवणात तीन बर्गर आणि फ्राईज यांचा समावेश असायचा. रात्रीच्या जेवणासाठी तो पास्ता खात असे, तसंच स्वीट डिश म्हणून चॉकलेट केक खाणं टॉमला आवडायचं.

  स्पर्धेव्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये टॉम दररोज आठ अंडी, चार पराठे आणि मशरूम अशा गोष्टी खातो. 20-30 स्ट्रॉबेरी, एक केळं आणि तीन चमचे व्हे प्रोटीन पावडर यांचा शेक, आणि टॉमचा आवडता बर्गर या गोष्टींचा समावेशही त्याच्या डाएटमध्ये असतो. वर्कआउट करण्यापूर्वी तो बर्गर खातो, तसंच वर्कआउटनंतर प्रोटिन शेक घेतो आणि दोन डोनट्स खातो. सोबतच दिवसभरात 250 ग्रॅम भात किंवा नूडल्स, किंवा एक मोठा बटाटा, भाज्या किंवा 300 ग्रॅम मांस यांचाही त्याच्या जेवणात समावेश असतो. एकूण डाएटमध्ये तो 90 टक्के हेल्दी फूड आणि 10 टक्के जंक फूड असं प्रमाण ठेवतो.

  (हे वाचा: तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश)

  लगेच कमी केलं वजन

  टॉमने सांगितलं, की एवढं झपाट्याने वजन वाढणं त्याच्या तब्येतीसाठी हानीकारक होतं. या पूर्वीही त्याचं वजन असंच भरपूर वाढलं होतं, ज्यामुळे तो एकदम आळशी झाला होता. दिवसाला तो 50 ते 100 सिगारेटही पीत असे. मात्र, या वेळी त्याने अशी परिस्थिती येऊ दिली नाही. स्पर्धा झाल्यानंतर लगेचच आपलं डाएट नियंत्रणात आणून त्याने आठवडाभरात हे वाढलेलं वजन पुन्हा कमी केलं.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Weight gain, Weight loss