मुंबई, 17 एप्रिल : काहीही सौंदर्यसमस्या आल्या, की आपण सर्वात आधी घरगुती उपाय करणं सुरू करतो. तरीही काही फरक न वाटल्यास जाहिरातींमध्ये सांगितलेले उपाय योग्य मानून ती उत्पादनं वापरणं सुरू करतो. अनेकदा तरीही समस्याच सुटत नाही. (health tips)
शेवटी आपण डॉक्टरकडे जातो. तेव्हा माहीत होतं, की बराच उशीर झालेला आहे. आपण एखाद्या गंभीर आजारानं ग्रस्त असतो. जाणून घ्या अशा ५ सौंदर्यसमस्या ज्या कदाचित गंभीर आजारांचं लक्षण दाखवत असू शकतात. (beauty problems related to health)
केस गळणं
जास्त ताण, झोप न येणं, संतुलित आहार न घेणं यामुळं केस गळतात. मात्र हे काही केल्या थांबत नसेल तर वेळ अजिबात न घालवता डॉक्टरांना भेटा. केस गळणं हे ऍनिमिया, थायरॉईड, प्रथिनांची कमतरता अशा आजारांची चिन्ह दाखवत असू शकतं. जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाल तितकं चांगलं. (beauty problems which indicate health problems)
एक्ने किंवा पिंपल्स
हार्मोन्सचं शरीरातील संतुलन बिघडल्यानं साधारणतः मुलींमध्ये एक्नेची समस्या दिसते. मात्र दीर्घकाळ एक्ने किंवा पिंपल्सची समस्या दिसत असेल तर डॉक्टरांना भेटणंच योग्य आहे. अनेकदा महिलांमध्ये ओव्हरीजच्या समस्येमुळेही एक्नेचा त्रास उद्भवतो. जास्त हार्मोनल चेंजेस शारीरिक समस्यां वाढवू शकतात. डॉक्टर्सही हे सांगतात, की कमकुवत रोगप्रतिकार क्षमतेमुळेही अनेकदा एक्ने होतात. (relation between health issues and beauty products)
डोळ्यांखाली काळी वर्तुळं
ताण आणि झोप नसल्यानं डोळ्यांखाली काळी वर्तुळं होतात. मात्र महिलांमध्ये याचं कारण हिमोग्लोबिनची कमतरता हेही असू शकतं. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ डार्क सर्कल्स राहत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जात तपासणी करून घ्या.
हेही वाचा मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या अनेक समस्येवर उपाय
सुकलेले, फाटलेले ओठ
साधारणतः कोरड्या ऋतूत ओठ फाटू लागतात. मात्र हे बॅक्टरिया किंवा यीस्ट यांच्या संसर्गामुळेही होऊ शकतं. शिवाय हे मधुमेह किंवा स्ट्रोक येण्याचंही लक्षण असू शकतं. सतत हे सुरू राहत असेल तर आधी डॉक्टरांकडे जा.
कमकुवत नखं
तुमची नखं खूप कमकुवत असतील आणि पुन्हा-पुन्हा तुटत असतील तर नक्की डॉक्टरांना दाखवा. कमकुवत नखं कॅल्शियमची कमतरता, ऍनिमिया किंवा थायरॉईडचं लक्षण असू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
हेही वाचा 30 मिनिटं 'मॉर्निंग वॉक' करुन अनेक आजारांना ठेवा दूर, जाणून घ्या जबरदस्त फायदे
वरीलपैकी कुठल्याही समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. वेळीच तपासणी करून चिंतामुक्त होणं कधीही चांगलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health Tips, Problem