मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बियांचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, आजच करा आहारात समावेश

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बियांचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, आजच करा आहारात समावेश

Pumpkin Seeds Benefits

Pumpkin Seeds Benefits

प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. काही भाज्यांची सालं आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : डायबेटीस, हृदयविकार, कॅन्सरसारखे गंभीर आजार टाळण्यासाठी आहारात फळं, भाजीपाल्याचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. काही भाज्यांची सालं आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. भोपळा हा त्यापैकीच एक होय. भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते. तसंच भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवता येतात. डायबेटीस, पोटाशी संबंधित त्रास असेल तर भोपळ्याच्या बिया आवर्जून खाव्यात. याशिवाय या बियांचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात. या बियांमध्ये झिंक, आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतं. या बियांचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. तसंच या बियांचा वापर सॅलड, स्मूदी, सूप आणि पास्तासारख्या अनेक पदार्थांमध्ये करता येतो. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोटदुखीची समस्या दूर होते. तसंच ब्लोटिंगचा त्रास दूर होऊन आराम मिळू शकतो. या बियांमुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

हेही वाचा  -  तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा...

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरची मुरमं कमी होतात. तसंच त्वचेवरची वृद्धत्वाची लक्षणंही कमी होतात. या बियांमुळे केस चमकदार आणि मुलायम होतात. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरसह अँटीऑक्सिडंट्स असतात. यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होतं. परिणामी हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं.

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्ससह अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते. संसर्गजन्य आजारांपासूनही संरक्षण मिळतं.

भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी आरोग्यविषयक समस्या दूर राहतात. या बियांमध्ये मॅग्नेशियम असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात. ब्लड शुगर लेव्हल अर्थात रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांसाठी या बिया लाभदायक ठरतात. या बियांमुळे मेंदू शांत राहतो. चिंता आणि तणाव कमी होतो.

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. मूठभर बिया खाल्ल्यास दीर्घ काळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अतिखाण्याची समस्या निर्माण होत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात या बियांचा आवर्जून समावेश करू शकता.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle