नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : स्वाइन फ्लू हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, जो स्वाइन म्हणजेच डुकरांना प्रभावित करतो. हा संसर्ग स्वाइनच्या संपर्कात आलेल्या लोकांना होऊ शकतो. गेल्या काही वर्षात हा आजार वाढला आहे पण वेळीच त्यावर नियंत्रणही मिळवलं आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या लोकांना थकवा, ताप, भूक न लागणे, खोकला आणि घसा खवखवणे असा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणे सर्वसाधारण तापासारखीच असतात. काही लोकांमध्ये ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे आणि जुलाब यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, या आजाराने बाधित लोक बरे होतात, परंतु योग्य उपचारांच्या अभावामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एकमेकांच्या संपर्कातून सहज पसरतो. या आजारापासून कुटुंबाला वाचवण्यासाठी, खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया स्वाइन फ्लूपासून बचाव कसा करायचा. स्वाइन फ्लू म्हणजे काय? स्वाइन फ्लूला H1H1 व्हायरस असेही म्हणतात. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा विषाणू आहे, जो सामान्य खोकला आणि सर्दीपासून सुरू होतो. हेल्थलाइन च्या माहितीनुसार, विषाणू स्वाइनपासून उद्भवतो आणि प्रामुख्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. 2009 मध्ये मानवांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे पहिल्यांदा दिसून आली. हा आजार जगभर पसरला आहे. WHO ने 2010 मध्ये H1H1 ला महामारी घोषित केले होते. संसर्गजन्य असल्याने हा आजार अधिक लोकांना प्रभावित करतो. कोविड-19 प्रमाणे, त्याच्या प्रतिबंधासाठी लसीकरण देखील आवश्यक ठरू शकते. स्वाइन फ्लू कसा टाळता येईल - - दरवर्षी फ्लूची लस घ्या. - साबणाने आणि हँड सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत. - अस्वच्छ हातांनी नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श करू नका. - ताप, खोकला, सर्दी असल्यास शाळेत आणि ऑफिसला जाऊ नका. - स्वाइन फ्लू टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका किंवा काळजी घ्या. - बाहेरचे अन्न खाणे टाळावे. - कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर हात स्वच्छ करायला विसरू नका. - तुम्हाला खोकला किंवा सर्दी असल्यास इतरांच्या संपर्कात येऊ नका, यामुळे संसर्ग पसरू शकतो. हे वाचा - चांगल्या दृष्टीसाठी नियमित करा डोळ्यांचे हे व्यायाम, डोळे कायम राहतील निरोगी स्वाइन फ्लूची लक्षणे - - थंडी वाजून येणे - ताप - खोकला - घसा दुखणे - नाक गच्च होणे आणि वाहणे - शरीर दुखणे - चक्कर येणे - अतिसार - उलट्या होणे
स्वाइन फ्लू उपचार - - अधिक विश्रांती घ्या - रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा - जास्त पाणी प्या - फळे आणि ज्यूसचे जास्त सेवन करा - मसालेदार अन्न टाळा - योग्य औषधे घ्या.