मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cholesterol Level: डोळ्यांमधील हा अनैसर्गिक बदल असू शकतो हृदयरोगाचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Cholesterol Level: डोळ्यांमधील हा अनैसर्गिक बदल असू शकतो हृदयरोगाचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Cholesterol Level: डोळ्यांमधील हा अनैसर्गिक बदल असू शकतो हृदयरोगाचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Cholesterol Level: डोळ्यांमधील हा अनैसर्गिक बदल असू शकतो हृदयरोगाचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Cholesterol Level increase symptoms: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास अनेक लक्षणं दिसून येतात. यात प्रामुख्याने घाम येणं, थकवा आणि अशक्तपणा जाणवणं, भूक न लागणं या लक्षणांचा समावेश असतो. या

मुंबई, 16 ऑगस्ट : हृदयाशी संबंधित कोणताही विकार (Heart Disease) हा जीवघेणा मानला जातो. अलीकडच्या काळात बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटिस, ताणतणाव आदी कारणांमुळे हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकारात कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol Level) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास अनेक लक्षणं दिसून येतात. यात प्रामुख्याने घाम येणं, थकवा आणि अशक्तपणा जाणवणं, भूक न लागणं या लक्षणांचा समावेश असतो. याव्यतिरिक्त काही लक्षणं डोळ्यांमध्ये (Eye) दिसून येतात. डोळ्यांमध्ये काही अनैसर्गिक बदल हे कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं, अशावेळी तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं. गुड अर्थात चांगलं आणि बॅड अर्थात खराब असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. शरीरासाठी कोलेस्टेरॉल गरजेचं असलं तरी त्याची पातळी वाढली तर ते नुकसानदायी ठरू शकतं. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. हा पदार्थ रक्तात (Blood) आढळतो. अनेकदा हा पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून बसतो आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. यामुळे ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने हृदयाशी संबंधित विकार, हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणं आवश्यक असतं. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास डोळ्यात काही लक्षणं दिसतात. मात्र आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. हेही वाचा- Increase Eyesight : निरोगी डोळ्यांसाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; मिळतील सर्व पोषक घटक 2021 मध्ये जर्नल ऑफ न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यासाठी तसेच खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी बीन्स अर्थात शेंगवर्गीय भाज्या किंवा त्यापासून तयार केलेले डाळींसारखे पदार्थ फायदेशीर ठरतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कॅन्ड बीन्स म्हणजेच डबाबंद डाळी ब्लॅक, नेव्ही, पिंटो, गडद लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या डाळी खावू शकता. संशोधकांच्या मते, बीन्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. पचनावेळी फायबरमुळे शरीरात कोलेस्टेरॉल शोषण कमी होण्यास मदत होते. रोज एक कप म्हणजेच 180 ग्रॅम वेगवेगळ्या पॅकबंद बिन्स खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन चांगलं कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराची जोखीम कमी होते. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असता, डोळ्यांमध्ये काही लक्षणं दिसू लागतात. रेटिनल व्हेन ऑकल्जन (Retinal vein occlusion) ही एक स्थिती असते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने ही स्थिती दिसते. यात डोळ्यातील रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. यामुळे गंभीर स्वरुपाचा दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा स्वरुपाचे लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आर्कस सेनिलिस (Arcus senilis) ही अशी स्थिती असते, ज्यामध्ये डोळ्याच्या पुढील भागाभोवती निळया, पांढऱ्या किंवा हलक्या राखाडी रिंग तयार होऊ शकतात. हा त्रास कॉर्नियाच्या वरच्या किंवा खालच्या भागापासून सुरू होऊ शकतो आणि कालांतराने वाढत जावू शकतो. कोलेस्टेरॉल वाढल्याचं हे लक्षण असतं. एक्सान्थेल्सेमा (Xanthelasma) हे देखील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याचं एक लक्षण आहे. या स्थितीत डोळ्यांभोवती पिवळेपणा येऊ शकतो. त्वचेखाली कोलेस्टेरॉल जमा झाल्याने ही समस्या निर्माण होते. हाय कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं वैद्यकीय तपासणी, निदान आणि उपचार घेणं आवश्यक आहे.
First published:

Tags: Heart Attack, Heart risk, Tips for heart attack

पुढील बातम्या