मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाश झालाय? मग या सवयी ताबडतोब करा बंद

तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाश झालाय? मग या सवयी ताबडतोब करा बंद

आपल्या काही सवयी आपण दूर केल्या तर आपली या त्रासातून सुटका होऊ शकते.

आपल्या काही सवयी आपण दूर केल्या तर आपली या त्रासातून सुटका होऊ शकते.

आपल्या काही सवयी आपण दूर केल्या तर आपली या त्रासातून सुटका होऊ शकते.

सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेक लोक घरून काम करत असल्यानं स्क्रीनचा (Screen) वापर वाढला आहे. त्यामुळं आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहेत. लहान मुलंदेखील स्क्रीनच्या आहारी गेल्याचं दिसून येत आहे. आजकाल सर्वाधिक येणारी तक्रार आहे ती अपुऱ्या झोपेची. अनेकांना रात्री उशिरापर्यंत झोप (Sleep) येत नाही. अंथरुणावर पडलं तरी त्यांना झोप येत नाही. अंथरुणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागावी हे त्यांच्यासाठी स्वप्नच असतं. तसच अनेक तास स्क्रीनसमोर बसून काम केल्यानं डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ असे त्रासही होतात. या सगळ्या समस्यांचं मूळ आपली दिनचर्या, आपल्या सवयी यामध्येच आहे. आपल्या काही सवयी आपण दूर केल्या तर आपली या त्रासातून सुटका होऊ शकते. एबीपी लाईव्ह डॉट कॉमनं याबाबत माहिती दिली आहे.

फोनचा वापर 

आजकाल झोपायला जाण्याआधी तासभर मोबाइल फोन न वापरण्याचा (Mobile Phone) सल्ला सतत दिला जात असल्याचं आपण पाहतो. त्यात निश्चितच तथ्य आहे. झोपेच्या आधी फोन किंवा डिजिटल डिव्हाइस वापरल्यानं त्यातून उत्सर्जित होणारे किरण शरीरातील मेलाटोनिनची पातळी कमी करतात. झोपेच्या चक्रात मेलाटोनिन खूप महत्वाची भूमिका बजावते. मेलाटोनिनची पातळी कमी असेल तर आपण झोपू शकत नाही. अंथरुणावर पडून मोबाइल फोन बघत राहिल्यानं तुमचा मेंदूही कार्यरत राहतो, त्यामुळे तुम्हाला झोप येऊ शकत नाही.

धूम्रपान, चहा, कॉफी सेवन, उशिरा व्यायाम

त्याचबरोबर संध्याकाळी धुम्रपान (Smoking), रात्री उशिरा व्यायाम, चहा -कॉफीचे (Tea -Coffee) सेवन या सवयीही झोपेला तुमच्यापासून दूर नेतात. दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला झोप येण्यासाठी सिगरेटचा एक कश आवश्यक वाटेल; पण हाच एक कश तुमची झोप कायमची उडवतो. तंबाखूमधील निकोटीन हे एक उत्तेजक द्रव्य असल्यानं झोप येण्याऐवजी दूर जाते आणि या सवयीमुळे तुम्हाला निद्रानाश जडतो. तुम्हाला चांगली झोप यावी असं वाटत असेल तर धूम्रपान करणे उपयोगाचे नाही.

चहा किंवा कॉफी

अनेकदा पावसाळ्याचे, थंडीच्या दिवसात काम करताना चहा, कॉफी पिण्याची गरज वाटते. कामाचा ताण दूर करण्यासाठीही अनेकजण चहा, कॉफी घेतात. मात्र संध्याकाळी, रात्री उशिरा चहा, कॉफीचं सेवन केल्यानं त्यातील उत्तेजक द्रव्यं आपला मेंदूला उत्तेजना देतात त्यामुळं आपल्या झोपेचं चक्र बिघडते.

 अवेळी व्यायाम

अनेकदा दिवसभरात वेळ मिळत नसल्यानं अनेक लोक संध्याकाळी किंवा रात्री व्यायाम करतात. व्यायाम करणं हे शरीर आणि मनासाठीही चांगलं असलं तरी अवेळी केलेला व्यायाम तुमचं झोपेचं चक्र बिघडवतो. संध्याकाळी 7 नंतर तुम्ही कसून व्यायाम करत असाल तर तुमच्या झोपेचं खोबरं झालच म्हणून समजा. व्यायाम केल्यानं, शरीर थकलं आहे आता आपल्याला छान गाढ झोप लागेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. व्यायामामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते आणि तुमचं शरीर अधिक ताजंतवानं होईल. अर्थात जॉगिंग किंवा चालणं हानिकारक नाही.

तेव्हा अपुरी झोप, निद्रानाश अशा समस्यांपासून वाचायचं असेल तर आपली दिनचर्या सुधारा. स्क्रीनचा वापर कमी करा. चहा, कॉफी घेऊ नका, धुम्रपान करू नका, रात्री उशिरा व्यायाम करू नका. या सवयी दूर केल्यात तर निद्रादेवी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Sleep