जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / वय कमी करण्यासाठी 'हा' उद्योगपती करतोय लाखो रुपये खर्च; आतापर्यंत 5 वर्ष वय कमी केल्याचा दावा

वय कमी करण्यासाठी 'हा' उद्योगपती करतोय लाखो रुपये खर्च; आतापर्यंत 5 वर्ष वय कमी केल्याचा दावा

वय कमी करण्यासाठी 'हा' उद्योगपती करतोय लाखो रुपये खर्च; आतापर्यंत 5 वर्ष वय कमी केल्याचा दावा

वाढत्या वयातदेखील आपण तरुण दिसावं, आपलं तारुण्य कायम टिकावं, असं कित्येकांना वाटतं. यासाठीच एक उद्योगपती लाखो रुपये खर्च करत आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : वाढत्या वयातदेखील आपण तरुण दिसावं, आपलं तारुण्य कायम टिकावं, असं कित्येकांना वाटतं. यासाठी काही जण कॉस्मेटिक सर्जरी, ब्युटी ट्रीटमेंटसारखे पर्याय निवडतात; पण एका उद्योगपतीने आपलं वय कमी करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्याने त्याचं जैविक वय सुमारे पाच वर्षांनी कमी केल्याचा दावा केला आहे. वय कमी करण्यासाठी ही व्यक्ती आपला फिटनेस आणि आहाराची विशेष काळजी घेते. वय कमी करण्यासाठी आणि कायम तरुण दिसावं यासाठी या व्यक्तीनं राबवलेला हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, ते जाणून घेऊ या.  प्रोजेक्ट ब्लू प्रिंट  KernelCo आणि Brain Tree नावाच्या नामांकित कंपनीचे संस्थापक ब्रायन जॉन्सन सध्या प्रोजेक्ट ब्लूप्रिंट नावाच्या एका प्रकल्पावर विशेष काम करत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वतःचं वय कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत आपलं वय पाच वर्षांनी कमी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत. जॉन्सन आपलं वय कमी व्हावं यासाठी फिटनेस आणि आहाराकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यांनी 2013मध्ये आपली कंपनी 6500 कोटी रुपयांना पे-पल (PayPal) या कंपनीला विकली होती. हेही वाचा :   घशात चॉकलेट अडकल्यानं गमावला 8 वर्षांच्या मुलानं जीव; तुमच्याबाबतीत असं घडलं तर काय कराल? जाणून घ्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष   वय कमी व्हावं, यासाठी जॉन्सन आपल्या आरोग्याशी निगडित प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देत आहेत. तसंच प्रोजेक्ट ब्लूप्रिंटविषयी ते सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून अपडेट्स देत आहेत. ब्रायन जॉन्सन @bryan_johnson या ट्विटर अकाउंटवरून आहार, विहार, व्यायामाशी निगडित माहिती ते शेअर करत असतात. ट्विटरवर त्यांचे सुमारे 52 हजार फॉलोअर्स आहेत. मागच्या वर्षी त्यांनी एका यू-ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ब्लूप्रिंट प्रोजेक्टअंतर्गत असलेलं त्यांच्या संपूर्ण दिवसाचं रूटीन शेअर केलं होतं. `मी माझे जैविक वय कमी करण्याचा प्रयत्न करतोय,` असा दावा जॉन्सन यांनी केला आहे. `प्रोजेक्ट ब्लूप्रिंटमुळे मी माझं वय 5.1 वर्षांनी कमी केलं आहे,` असं जॉन्सन याचं म्हणणं आहे.ब्रायन जॉन्सन यांनी सांगितलं, `मी 10 वर्षं डिप्रेशनमध्ये होतो. त्यानंतर मी स्वतःसोबतच मैत्री केली. तेव्हापासून मला आनंदी, रचनात्मक आणि परिपूर्ण वाटतं आहे. हेही वाचा :   Oil Pulling : तोंडाच्या सर्व समस्या होतील दूर; पाण्याऐवजी नियमित ‘या’ तेलाने करा गुळण्या  वेलनेस प्रोटोकॉल ब्रायन जॉन्सन यांनी प्रोजेक्ट ब्लूप्रिंट अंतर्गत एक वेलनेस प्रोटोकॉल तयार केला आहे. यात शरीरातल्या 78 अवयवांसाठी बायोमार्कर तयार केले आहेत. या बायोमार्करच्या मदतीने ते शरीरातल्या बदलांचा तपशील नोंदवतात. जॉन्सन आहाराची विशेष काळजी घेतात. त्यांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, नट्स, कडधान्य, बेरीज यांचा समावेश असतो. जॉन्सन आपल्या झोपेचंदेखील बारकाईनं निरीक्षण करतात. यासाठी ते WHOOP चं डिव्हाइस वापरतात. जॉन्सन काटेकोरपणे वर्कआउट करतात. सध्या त्यांचं वय 44 वर्षं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये ते किती यशस्वी ठरतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: fitness , health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात