भोपाळ, 15 ऑक्टोबर : तुम्ही डॉक्टरांनी दिलेलं औषधांचं प्रिस्क्रिप्शन पाहिलं असेल तर त्यात काही शब्द मेडिकल टर्म किंवा वैद्यकीय कोड असतात. ज्याबाबत सामान्य माणसांना फार माहिती नसते. तसंच डॉक्टर रुग्णांना प्रिस्क्रिप्शनमध्ये जे लिहून देतात ती त्यांची लिखाणाची भाषासुद्धा तशी सामान्यांना समजत नाही. याच प्रिस्क्रिप्शनवर आता मुख्यमंत्र्यांनी श्री हरी लिहिण्याचा अजब सल्ला डॉक्टरांना दिला आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना हा अजब सल्ला दिला आहे. एमपीचे सीएम मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉक्टरांनी मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर श्री हरी लिहावं असं सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात ते डॉक्टरांना हिंदीतून प्रिस्क्रिप्शन देण्यास सांगत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “डॉक्टरांना साधं क्रोसिन लिहून द्यायचं असेल तर त्यांनी थेट हिंदीतच क्रोसिन लिहून द्यायचं. सोबत प्रिस्क्रिप्शनवर श्री हरीही लिहा” त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वजण हसू लागतात. यावर प्रिस्क्रिप्शनच्या वरच्या बाजूला जिथं आर एक्स असतं तिथं Rx च्या जागी श्री हरी लिहिण्याचा मुख्यमंत्री पुन्हा उल्लेख करतात. हे वाचा - पंतप्रधान मोदींच्या भाषणातून प्रेरणा घेऊन तरुणाने सुरू केलं ‘हे’ काम, तुम्हालाही वाटेल अभिमान देशात पहिल्यांदाच एमबीबीएसचं शिक्षण हिंदीतून होणार आहे. मध्य प्रदेश देशातील असं पहिलं राज्य आहे. भोपाळमधील एका कॉलेजमध्ये प्रायोगिक तत्वावर हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, “गावातील गरिब व्यक्तीलाही आपलं मूल इंग्रजी मीडियमध्ये शिकावं असं वाटतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. एका मुलाला इंग्रजी येत नाही म्हणून त्याने मेडिकल कॉलेज सोडल्याचं मी पाहिलं आहे. प्रौढांनी मुलांच्या मनात हिंदीबाबत मानसिकता तयार करायला हवी. हिंदीबाबत त्यांच्या मनात प्रेम, आदर निर्माण करायला हवा” हे वाचा - पृथ्वीच्या पोटात ज्ञानाचं भांडार, आशियातील सर्वात मोठं भूमिगत वाचनालय भारतात “हिंदीतून वैद्यकीय शिक्षण ही नव्या युगाची सुरुवात आहे, असं मला वाटतं आणि ती भोपाळमधून होत आहे”, असंही सीएम चौहान म्हणाले.