न्यूयॉर्क, 16 ऑगस्ट : पेन्सिलमध्ये जे लीड (Pencil Lead) वापरलं जातं, त्याचा उपयोग आता कोरोना टेस्ट (corona test) करण्यासाठी होणार आहे. या टेस्टसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रोड्स (Electrodes) हे लीडपासून तयार केले जात असून सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या टेस्टच्या तुलनेत ही टेस्ट स्वस्त (Cheaper) आणि जलद (Faster) असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
अशी होणार टेस्ट
अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या टेस्टचा शोध लावला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या टेस्टपेक्षा अधिक परिणामकारक टेस्टचा शोध लावण्याच्या हेतूनं हे शास्त्रज्ञ संशोधन करत होते. सध्याच्या चाचण्यांमध्ये मुख्यत्वे दोन दोष आढळतात. पहिला म्हणजे या चाचण्यांची परिणामकारकता कमी आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचा निकाल यायला वेळ लागतो. या दोन्ही त्रुटी दूर करणारी चाचणी म्हणून या नव्या चाचणीकडे पाहिलं जात आहे.
खर्चही होणार कमी
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या टेस्टच्या तुलनेत ही टेस्ट स्वस्त असेल, असं सांगितलं जात आहे. या पद्धतीच्या प्रत्येक चाचणीसाठी केवळ 1.5 अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारण 125 ते 130 रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय केवळ 6.5 मिनिटांत या टेस्टचा निकाल येईल, असंही सांगण्यात आलं आहे. या टेस्टचं नाव लीड टेस्ट (The Low Cost Electrochemical Advanced Diagnostic) असं असून त्याची परिणामकारकता 100 टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - ..तर पुन्हा Lockdown; निर्बंध हटवल्याच्या पहिल्याच दिवशी CM ठाकरेंनी दिला इशारा
RAPID टेस्टचा फॉर्म्युला
बाजारात उपलब्ध असणाऱ्या रॅपिट अँटिजन टेस्टसाठीदेखील लीडचा वापर करण्यात येतो. मात्र लीडव्यतिरिक्त या टेस्टमध्ये असणाऱ्या इतर साहित्याचा खर्च कमी असल्यामुळे नवी टेस्ट स्वस्त असणार आहे. या टेस्टचे किट वजनाला हलके आणि स्वस्त असल्यामुळे बाजारात त्याची उपलब्धता अधिक जलदगतीने होऊ शकते, असं शास्त्रत्रांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.