मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Salman Khan Bodyguard Heart attack : काय येतो जिममध्ये हार्ट अटॅक? सलमानच्या बॉडीगार्डचाही यामुळेच मृत्यू

Salman Khan Bodyguard Heart attack : काय येतो जिममध्ये हार्ट अटॅक? सलमानच्या बॉडीगार्डचाही यामुळेच मृत्यू

सलमान खानच्या बॉडीगार्डचा जिममध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यू

सलमान खानच्या बॉडीगार्डचा जिममध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यू

जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची अशी बरीच प्रकरणं आहेत. यामागे नेमंकी काय कारणे आहेत? जिमचा हृदयविकाराशी काही संबंध आहे का? याबाबत हृदयरोगतज्ज्ञांकडून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड सागर पांडेचं हार्ट अटॅकने निधन झालं आहे. जिममध्ये एक्सरसाइझ करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही जिममध्येच व्यायाम करताना हार्ट अटॅक आला होता. जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची अशी बरीच प्रकरणं आहेत. यामागे नेमंकी काय कारणे आहेत? जिमचा हृदयविकाराशी काही संबंध आहे का? याबाबत हृदयरोगतज्ज्ञांकडून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

हार्ट अटॅक म्हटलं की आधी वयस्कर व्यक्तींनाच यायचा पण आता कोणत्याही वयात हार्ट अटॅक येतो. बदलत्या आणि अयोग्य जीवशैलीचा हा परिणाम आहे. हार्ट अटॅक येण्याची बरीच कारणं आहेत. पण बहुतेकदा आपल्या चुकाच यासाठी कारणीभूत असतात. त्यापैकीच एक म्हणजे जिममध्ये होणाऱ्या चुका. जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्याचा अति उत्साह धोकादायकही ठरू शकतं, जर तुम्ही आवश्यक ती काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि  जिममध्ये अशी काही प्रकरण समोर आली आहेत.

हे वाचा - Salman Khan Bodyguard Died: अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्डचा मृत्यू; जीममध्ये आला हार्ट अटॅक

नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल मधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, अनेक वेळा जीममुळे आपल्या हृदयाच्या ईसीजीमध्ये बदल होतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येतो. काही लोक कमी वेळात उत्तम शरीर बनवायचे असेल तर सप्लिमेंट्स घेऊन जिम करतात. सप्लिमेंट घेतल्यानंतर जीम केल्याने हृदयाचे ठोके अबनॉर्मल होतात. यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

डॉ. वनिता अरोरा सांगतात की, सर्व लोकांनी जिममध्ये जाण्यापूर्वी कार्डियाक कन्सल्टंट करणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक 30 किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी वेट लिफ्टिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, ट्रेडमिल करण्यापूर्वी कार्डिओलॉजिस्टला नक्कीच भेटावे. पटकन शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवणे देखील योग्य नाही. व्यायाम एका मर्यादेत करावा. जिम देखील पात्र प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावी, जेणेकरून समस्या टाळता येतील.

हे वाचा - Heart attack चा इतका मोठा झटका; पन्नाशी गाठलेला 'तो' 25 वर्षांचा तरुण दिसू लागला

डॉ. वनिता अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लोकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही. उद्यानात जाऊन 40 मिनिटांत 4 किमी चालून ते तंदुरुस्त राहू शकतात. मात्र, ज्यांना व्यायामशाळेत जायचे आहे, त्यांनी प्रथम हृदयरोगतज्ज्ञांशी बोलावे. ट्रेडमिलवर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका. वेट ट्रेनिंग करू नये. जर तुम्हाला एरोबिक्स करायचे असेल तर थोडा वेळ करा.

First published:

Tags: Health, Heart Attack, Lifestyle