मराठी बातम्या /बातम्या /heatlh /cancer : वयाच्या पन्नाशीआधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतोय, रिसर्चमधून समोर आली आजाराच्या वाढीची कारणं

cancer : वयाच्या पन्नाशीआधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतोय, रिसर्चमधून समोर आली आजाराच्या वाढीची कारणं

मागच्या काही दशकांमध्ये 50 वर्षांखालील व्यक्तींमध्ये कॅन्सर या जीवघेण्या आजाराचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण इतकं वाढलंय की 50 पेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सामान्य झाला आहे.

मागच्या काही दशकांमध्ये 50 वर्षांखालील व्यक्तींमध्ये कॅन्सर या जीवघेण्या आजाराचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण इतकं वाढलंय की 50 पेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सामान्य झाला आहे.

मागच्या काही दशकांमध्ये 50 वर्षांखालील व्यक्तींमध्ये कॅन्सर या जीवघेण्या आजाराचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण इतकं वाढलंय की 50 पेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सामान्य झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 सप्टेंबर : मागच्या काही दशकांमध्ये 50 वर्षांखालील व्यक्तींमध्ये कॅन्सर (cancer) या जीवघेण्या आजाराचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण इतकं वाढलंय की 50 पेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सामान्य झाला आहे. ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील संशोधकांना असं आढळून आलंय की अर्ली ऑनसेट मॅलिग्नेसिस आणि वयाची 50 वर्षं पूर्ण करण्यापूर्वी कॅन्सरचं निदान होणाऱ्या लोकसंख्येत 1990 पासून जागतिक स्तरावर लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, कोलन, अन्ननलिका, किडनी, लिव्हर आणि स्वादुपिंड (Pancreas) यांच्या कॅन्सरचा समावेश आहे. या संदर्भात डीएनएने वृत्त दिलंय.

संशोधकांनी इतक्या कमी वयात तरुणांना कॅन्सरचं निदान का होत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच याला कारणीभूत असलेल्या पेशंटच्या जीवनातील माहिती आणि ऑनलाइन सहज उपलब्ध असलेल्या डेटाचं सखोल विश्लेषण केलं. या संशोधनाचे निष्कर्ष नेचर रिव्ह्यूज क्लिनिकल ऑन्कॉलॉजीमध्ये (Nature Reviews Clinical Oncology) प्रकाशित झाले आहेत.

ब्रिघमच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि फिजिशियन, शास्त्रज्ञ शुजी ओगिनो (Shuji Ogino,PhD, MD) यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, संशोधकांना डेटावरून असं आढळून आलं की या घटनेला बर्थ कोहोर्ट इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. या निरीक्षणांतून असं दिसून आलंय की 1960 नंतरच्या दशकात किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना उतारवयात कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे.

या व्यक्तींच्या तरुणाईत असलेल्या वातावरणाचा परिणाम झाला असून, तेच त्यांच्या शरीरात कॅन्सर विकसित होण्यास कारण ठरलं आहे असंही या निरीक्षणांतून दिसून आलंय. "प्रत्येक नव्या पिढीबरोबर कॅन्सरचा धोका वाढतोय, असं आम्ही शोधून काढलंय. उदाहरणार्थ, 1950 च्या तुलनेत 1960 मध्ये जन्मलेल्यांना वयाच्या 50शीपूर्वी कर्करोग होण्याची शक्यता जास्त होती आणि आम्हाला वाटतंय की हा धोका कालांतराने पिढीनुसार वाढेल," असं ओजिना यांनी पुढे स्पष्ट केलं.

तोमोटाका उगाई (Tomotaka Ugai, MD, PhD) या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि पॅथॉलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2000 ते 2012 दरम्यान 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये 14 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या घटनांवरील जागतिक डेटाचे सर्वात आधी परीक्षण केले. त्यानंतर टीमने संभाव्य रिस्क फॅक्टर्ससाठी सामान्य लोकसंख्येच्या ट्रेंडवर लक्ष केंद्रित करणार्‍या अभ्यासांचा शोध घेतला. त्यामध्ये रुग्णांच्या सुरुवातीच्या जीवनातील एक्सपोजर या महत्त्वाच्या घटकाचा समावेश होता.

या अभ्यासाअंती टीमने वयाच्या 50 वर्षांच्या आधी निदान झालेले कॅन्सर आणि क्लिनिकल तसेच बायोलॉजिकल ट्यूमरमुळे (biological tumour) नंतर सुरू होणारे कॅन्सर यांच्यातील फरकांचे वर्णन करणाऱ्या साहित्याचा अभ्यास केला.

यामध्ये त्यांनी रुग्णांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील एक्सपोझोम ज्यामध्ये व्यक्तीचे पोषण, लाइफस्टाइल, वजन, पर्यावरणाशी संपर्क आणि मायक्रोबायोम यांचा समावेश असलेल्या घटकांचा अभ्यास केला. गेल्या काही दशकांमध्ये या एक्सपोझोममध्ये लक्षणीय बदल झाला आहे. पाश्चिमात्य खाद्यपदार्थ आणि लाइफस्टाइलमुळे कमी वयात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

संशोधकांनी पुढे नमूद केलं की कॅन्सरच्या तपासणीसाठी सध्या अनेक उपाय उपलब्ध आहेत. हे सुद्धा कॅन्सरच्या प्रकारांच्या घटनांमध्ये वाढीसाठी अंशतः जबाबदार आहे. कारण ते या आजाराच्या वाढत्या प्रसाराची अचूक टक्केवारी मोजू शकले नाहीत, ते फक्त स्क्रीनिंग आणि आजार लवकर ओळखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच 14 पैकी बर्‍याच प्रकारच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ हा स्वतः सुधारित तपासणींचा परिणाम आहे, हे संशयास्पद आहे, असंही ते म्हणाले.

संभाव्य कारणं कोणती?

दारूचं (Alcohol ) सेवन, झोपेची कमतरता, धूम्रपान (smoking), लठ्ठपणा आणि हाय प्रोसिड जेवण ही सर्व कॅन्सरच्या सुरुवातीच्या संभाव्य धोक्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. तरुणांना मागच्या दशकाच्या तुलनेत आता खूपच कमी झोप मिळत आहे, असा शोधही संशोधकांनी लावलाय. तसेच प्रौढांच्या झोपेच्या तासांमध्ये मागच्या काही वर्षांत बदल झालेला नाही, असंही संशोधक सांगतात.

1950 च्या दशकापासून प्रक्रिया केलेलं जेवण, साखरेचं प्रमाण जास्त असलेली ड्रिंक्स, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, अनहेल्थी लाईफस्टाइल आणि अल्कोहोलचा वापर अशा रिस्क फॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उगई म्हणाले, “आम्ही मूल्यांकन केलेल्या कर्करोगाच्या वाढत्या 14 प्रकारांपैकी आठ पचनक्रियेशी संबंधित आहेत. आपल्या पोटातील सूक्ष्मजंतूंना आपण जे अन्न खातो, त्यातून पोषण मिळतं.

मायक्रोबायोमच्या मेकअपवर आहाराचा थेट परिणाम होतो आणि कालांतराने या बदलांचा आजाराच्या जोखमीवर आणि प्रोग्नोसिसवर परिणाम होऊ शकतो.”

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांकडे कॅन्सरच्या घटनांमध्ये वर्षभरातील ट्रेंडचा मागोवा घेण्यासाठी पुरेसा डेटा नसणे ही अभ्यासाच्या मर्यादांपैकी एक आहे. ओगिनो आणि उगाई यांचा भविष्यात अधिक माहिती गोळा करून आणि जागतिक ट्रेंडचा चांगल्या प्रकारे मागोवा घेण्यासाठी इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांसोबत (international research institutions) काम करून हे संशोधन पुढे चालू ठेवण्याचा मानस आहे.

याव्यतिरिक्त, त्यांनी पालकांच्या संमतीने लहान मुलांचा अभ्यास करण्याची गरज बोलून दाखवली. त्यांच्या मते आता लहान मुलांचा अभ्यास केल्यास भविष्यात त्यांच्या लहानपणाचा अभ्यास संदर्भ म्हणून असेल तर त्याचा फायदा होईल. कारण अशा अभ्यासाशिवाय, कॅन्सर झालेल्या व्यक्तीने लहान असताना काय केले होते, हे ओळखणे कठीण आहे," असं उगई यांनी स्पष्ट केले.

First published:

Tags: Cancer, Health, Health Tips, Research