दिल्ली, 14 सप्टेंबर : नवीन घर घेताना (New Home) किंवा नवीन घरात रहायला येण्याआधी आपण त्या घराच्या संबंधीच्या अनेक गोष्टींची चाचपणी करत असतो. त्यामध्ये घराची जागा किंवा संबंधित परिसर आणि इतर महत्त्याच्या गोष्टी लक्षात घेतल्यावरच आपण घरखरेदी करण्याचा निर्णय घेतो. त्यातून आपल्याला आपल्या आयुष्याच यशाची आस असते. परंतु घरात रहायला आल्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याला आपण सतत दुर्लक्ष करत असतो. त्यामध्ये घरातील व्यक्तींचा दैनंदिन व्यवहार, वापर या गोष्टींमुळे आपल्याला तोटा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपण आपल्या आयुष्यात अशा अनेक वैयक्तिक अडचणींना सामोरं जातो, तर त्याची काय कारणं असू शकतात, कशामुळे या गोष्टी घडतात, याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊयात.
वास्तूशास्त्रानुसार (Architecture) घरात अंथरूणावर बसून जेवण करण्याला चुकीचे लक्षण मानले जाते. अंथरूणावर बसून जेवण (Meal On Bed) करणारा व्यक्ती हा आपल्या आरोग्याबाबत (Health) निष्काळजी असतो. त्यामुळे अंथरूणावर बसून जेवणाऱ्या आणि स्वयंपाकघरात अस्वच्छ ताटं न धुणारी व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या तंगीत सापडण्याची शक्यता वास्तूशास्त्रानुसार व्यक्त केली गेली आहे. या शास्त्रानुसार रात्री आपल्या बाथरूममध्ये पाण्याची बाटली भरुन ठेवल्याने आयुष्यातील नकारात्मक भाव कमी होण्यास मदत होते.
हे Lip महिलेचे नाहीत तर...; या ओठात दडलेला 'राज' समजला तर थक्कच व्हाल
त्याचबरोबर या सवयीमुळे धनलाभ होण्याचाही फायदा यात सांगितला गेला आहे. आपल्या नवीन घरात ईशान्य दिशेला पुजास्थळं बनवणे हे शुभ मानले जाते. त्याचबरोबर वास्तूशास्त्रानुसार आपल्या घराबाहेर कचरा फेकणेही धोक्याचे मानले गेले आहे. त्यामुळे आपले शेजारी शत्रू वनण्याची शक्यता असते. सुर्यास्तानंतर कुणालाही दान करताना त्याला दूध, दही किंवा मीठ देऊ नये, त्यामुळे आपली आर्थिक स्थिती ढासळण्याचीही शक्यता या वास्तूशास्त्रानुसार सांगितली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Work from home