मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

किडनीच्या 'या' आजारानं त्रस्त होते राकेश झुनझुनवाला, काय आहे हा आजार अन् त्याची लक्षणं कोणती? वाचा सविस्तर

किडनीच्या 'या' आजारानं त्रस्त होते राकेश झुनझुनवाला, काय आहे हा आजार अन् त्याची लक्षणं कोणती? वाचा सविस्तर

Chronic kidney disease आजारानं त्रस्त होते राकेश झुनझुनवाला, काय आहे हा आजार अन् त्याची लक्षणं कोणती? वाचा सविस्तर

Chronic kidney disease आजारानं त्रस्त होते राकेश झुनझुनवाला, काय आहे हा आजार अन् त्याची लक्षणं कोणती? वाचा सविस्तर

Chronic kidney disease: राकेश झुनझुनवाला क्रोनिक किडनी फेल्युअर नावाच्या आजारानं त्रस्त होते. त्यांना नियमित डायलिसिस करावं लागत होतं, असं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं.

  मुंबई, 14 ऑगस्ट- राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ब्रिज कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेअर मार्केटमधील बादशाह म्हणून त्यांची ओळख होती.  शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान राकेश झुनझुनवाला यांच्या डॉक्टर रुची समदानी यांनी म्हटलं आहे की, “ राकेश झुनझुनवाला दीर्घ काळापासून किडनी विकारानं त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. त्यांना मधुमेह तसेच हृदयविकारही होता. त्यासाठी आम्ही नुकतीच अँजिओप्लास्टी केली होती. ते खूप चांगले काम करत होतं, जीवनावश्यक गोष्टीही चांगल्या होत्या. आम्ही दररोज त्याच्या संपर्कात होतो. परंतु या घटनेनं धक्का बसला. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, तेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरलं.” राकेश झुनझुनवाला यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती त्यांच्या डॉक्टर रुची समदानी यांनी दिली आहे. परंतु त्याचवेळी त्यांनी राकेश झुनझुनवाला दीर्घ काळापासून Chronic kidney disease त्रस्त होते, असंही सांगितलं. हा आजार नेमका काय आहे, आणि त्याची लक्षणं काय आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. क्रोनिक किडनी फेल्युअर (Chronic kidney disease)- किडनी आपल्या शरीराताली रक्त शुद्ध ठेवण्याचं काम करते. रक्तातील विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन शरीराबाहेर टाकले जातात. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. तसेच आम्ल आणि क्षारही नियंत्रित करते.परंतु जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागतं, यालाच किडनी निकामी होणं म्हणतात. शरीरामध्ये दोन किडन्या असतात. जर एक किडनी खराब होते, तेव्हा दुसरी किडनीचं काम चालूच असते. परंतु जेव्हा दोन्ही किडन्या खराब होतात, तेव्हा त्या स्थितीस किडनी फेल्युअर असे म्हणतात. किडनी फेल्युअरचे एक्युट किडनी फेल्युअर (Acute Renal Failure) आणि क्रोनिक किडनी फेल्युअर (Chronic Renal Failure) असे दोन मुख्य प्रकार आहेत. कोणत्याही इतर आजाराच्या दुष्परिणामामुळं किडन्या काही काळ काम करत नाहीत तेव्हा त्यास एक्युट किडनी फेल्युअर असं म्हणतात, तर अनेक प्रकारच्या रोगांमुळं किडनी हळू हळू काम करणं बंद करून शेवटी पूर्ण निकामी होते, तेव्हा त्यास क्रोनिक किडनी फेल्युअर असं म्हणतात. क्रोनिक किडनी फेल्युअर ठीक करण्यासाठी कोणतंही औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत किडनी निकामी झाल्यास किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग निवडावा लागतो. हेही वाचा-  Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करण्याचे आहेत हे 5 फायदे, अडचणीत होईल मोठी मदत क्रोनिकल किडनी फेल्युअर होण्यामागील कारणं (Chronic Kidney Disease causes)-
  • क्रॉनिक किडनी फेल्युअर होण्यासाठी मधुमेह आणि हाय ब्लडप्रेशर ही दोन प्रमुख कारणं आहेत.
  • किडनीला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात बाधा निर्माण झाल्यासही किडनी फेल्युअर होऊ शकते.
  • मूतखड्यामुळंही किडनी निकामी होण्याचा धोका असतो.
  • रासायनिक खते, किटकनाशकंयुक्त आहार, अन्नभेसळ, आहारात वापरली जाणारे रंग यामुळंही किडनी फेल होऊ शकते.
  • काही औषधं किंवा वेदनाशामक औषधांच्या अतिवापरामुळं किडनी फेल्युअरचा धोका असतो.
  किडनी फेल होण्याची ची लक्षणे (Symptoms of Chronic Kidney Disease in Marathi)- सुरवातीची लक्षणे-
  • भूक कमी लागणे
  • मळमळ
  • कोरडी आणि खाजवणारी त्वचा
  • डोकेदुखी
  • सामान्यपणे बरे नसल्याची जाणीव
  • थकवा
  • वजन आपोआप कमी होणे
  • या टप्प्यात निदान झाल्यास किडनी फेल्युअर होण्यापासून वाचता येतं.
  नंतरच्या टप्प्याची लक्षणं-
  • मूत्रपिंडाच्या क्षतीमुळे झालेले रक्तातील कॅल्शिअम आणि फॉस्फोरस समतोळ बिघडल्यास हाडतील वेदना
  • जलसंचयामुळे हात, पाय आणि टाचांमध्ये शिथिलता किंवा सूज
  • शरिरात विषारी घटक वाढल्याने अनोमिआ किंवा मासासारखे गंध येणे
  • भूक कमी लागणे आणि वजन कमी होणे
  • उलटी, वारंवार उचक्या
  • विशेषकरून रात्रीमध्ये, लघवीची वारंवारता वाढणे
  • श्वास छोटे होणे, थकवा
  • लघवी किंवा शौचातून रक्त येणे
  • एकाग्रता किंवा विचारात अडचण
  • मसल क्रॅंप
  • पाणी पिण्याची वारंवार आवश्यकता
  • मासिक पाळी न येणे(एमॅनॉरिआ)
  • निद्रानाश
  • त्वचेचे रंग खूप हलके किंवा गडद होणे
  • लैंगिक विकार
  • सीकेडीच्या शेवटच्या टप्प्याला किडनी फेल्युअर म्हणतात, अशा परिस्थितीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडू शकते.
  किडनी फेल झाल्यास करावे लागणारे उपचार (Treatment of Chronic Kidney Disease) - Chronic Kidney Disease पूर्णपणे बरा होत नाही आणि उपचाराच्या माध्यमातून त्याची तीव्रता वाढण्यापासून रोखणं हा उपचाराचा हेतू असतो. क्रोनिक किडनी फेल्युअर रूग्णांचे नियमित डायलिसिस करावे लागते. किडनी निकामी झाल्यामुळं रक्तात आणि शरीरात साठलेले विषारी घटक मशीनद्वारे कृत्रिमरित्या शरीराबाहेर काढले जातात. यालाच डायलिसिस असं म्हणतात. दोन्ही किडन्या फेल झाल्यास किडनी प्रत्यारोपन करावं लागतं.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Kidney sell, Serious diseases

  पुढील बातम्या