जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / लाईफ @25 : नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणात 'या' गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, नाहीतर वाढतील समस्या

लाईफ @25 : नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणात 'या' गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, नाहीतर वाढतील समस्या

लाईफ @25 : नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणात 'या' गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, नाहीतर वाढतील समस्या

बऱ्याचदा काम करणाऱ्या गरोदर महिलांना ऑफिस आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं यात समतोल राखताना समस्या येतात. अशा महिलांना काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : मातृत्व हे कोणत्याही स्त्रीसाठी आनंददायी अनुभूती असते, परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे गरोदरपणात अनेक आवाहन येऊ लागले आहेत. यामध्येही नोकरी करणाऱ्या महिलांसाठी गरोदरपणात स्वत:ला निरोगी ठेवणे खूप अवघड असते. कारण काम आणि आरोग्या या गोष्टी बऱ्याचदा बॅलेंस होत नाहीत. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या गरोदर स्त्रीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चला जाणून घेऊ

News18

जास्त वेळ खुर्चीवर बसू नका ऑफिसमध्ये काम करताना जास्त वेळ खुर्चीवर बसू नका. मध्येच उठून काही पावलं चाला. तसेच पाय लटकवून बसू नका. त्याऐवजी टेबलाखाली स्टूल ठेवा. यामुळे पाय आणि घोट्याला आराम मिळेल. अन्यथा, पायांना सूज येऊ शकते. त्याचप्रमाणे पाय आणि बोटांना मधे ताणून घ्या. यामुळे शरीराला आराम मिळेल. ताण घेणं टाळा कार्यालयीन कामकाजादरम्यान कामाचा ताण असणे सामान्य आहे, परंतु तरीही मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. कामात घाई करू नका, शांत मनाने काम पूर्ण करा. धावणे टाळा. कामाचा वेग तुम्हाला जेवढा सोईचा असेल तेवढा ठेवा. अन्यथा, मानसिक तणावामुळे मुलाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच चांगली झोप घ्या आणि गोष्टींचं नियोजन करा. गोष्टी वेळेवर केलात तर जास्त ताण जाणवणार नाही. जड वस्तू उचलणे टाळा घर असो वा कार्यालयात जड वस्तू उचलणे टाळा. एवढेच नाही तर वाकून करणारी कामे टाळा. अन्यथा पाठदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. जड वस्तू उचलण्याची गरज भासल्यास कोणाची तरी मदत घ्या. पाणी पिण्यास विसरू नका असे सहसा घडते की ऑफिसमध्ये काम करताना लोक पाणी पिणे विसरतात. परंतू गर्भवती महिलांसाठी ही मोठी समस्या असू शकते. पुरेसे पाणी न पिल्याने शरीराला लवकर थकवा जाणवू लागतो. एवढेच नाही तर डिहायड्रेशनमुळे चक्कर येण्यासारखी समस्या उद्भवते, त्यामुळे जवळ पाण्याची बाटली ठेवा आणि मध्येच थोडं-थोडं पाणी प्या. याशिवाय नारळपाणी, ज्यूस, सूप यासारख्या द्रवपदार्थांचेही सेवन करता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात