Home /News /heatlh /

युरेका! माणसाच्या शरीरात डुकराची किडणी, शास्त्रज्ञांनी केला ऐतिहासिक प्रयोग यशस्वी; लाखो रुग्णांना आशा

युरेका! माणसाच्या शरीरात डुकराची किडणी, शास्त्रज्ञांनी केला ऐतिहासिक प्रयोग यशस्वी; लाखो रुग्णांना आशा

माणसाच्या शरीरात डुकराच्या (Pig kidney successfully transplanted into human body) किडणीचं प्रत्यारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी झाला आहे.

    वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर:  माणसाच्या शरीरात डुकराच्या (Pig kidney successfully transplanted into human body) किडणीचं प्रत्यारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रयोगावर (Historic kidney transplantation experiment) काम सुरू होतं. वैद्यकीय जगतातील हा ऐतिहासिक प्रयोग मानला जात असून यामुळे जगभरातील किडणी रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण (Hope for all kidney patients) निर्माण झाला आहे. जगात किडणी न मिळाल्यामुळे प्राण गमावावे लागणारे लाखो रुग्ण आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या जीवनात एक नवी आशा निर्माण झाली आहे. असा झाला प्रयोग हा प्रयोग अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीवर केला. अशा व्यक्तींचा मेंदू निकामी झालेला असतो, मात्र शरीराचे इतर अवयव कार्यरत असतात. अशा व्यक्तीच्या शरीरात डॉक्टरांनी डुकराच्या किडणीचं प्रत्योरापण केलं आणि 54 तास या रुग्णाचं निरीक्षण करण्यात आलं. त्यानंतर माणसाच्या शरीरात डुकराची किडणी अगदी व्यवस्थित काम करत असल्याचं आढळून आलं. एक्सनोट्रान्सप्लँटेशनची प्रक्रिया वैद्यकीय भाषेत या प्रयोगाला एक्सनोट्रान्सप्लँटेशन असं म्हटलं जातं. याचा अर्थ एका प्राण्याच्या शरीरातील एखादा अवयव काढून त्याचं प्रत्यारोपण दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात करणे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता डुकरांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. अमेरिकेतील एका आकडेवारीनुसार किडणी न मिळाल्याने अमेरिकेत दररोज 17 रुग्णांचा जीव जातो. अशा परिस्थितीत मानवी शरीरात डुकराची किडणी बसवण्याचा प्रयत्न करणं, हे मोठं यश मानलं जात आहे. हे वाचा- कंगाल पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट, पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीव डुकराचीच किडणी कशासाठी? डुकराची किडणी मानवी शरीरासाठी सोयीस्कर असल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून मानलं जातं. मात्र डुकराच्या पेशींमध्ये एक शुगर सेल असतो, जे मानवी शरीर स्विकारत नाही. त्यामुळे आतापर्यंत हा प्रयोग आतापर्यंत यशस्वी होत नव्हता. हा अडथळा दूर करण्यासाठी डुकरामध्ये काही जेनेटिक बदल करण्यात आले होते. त्यामुळे नेहमी येणारा हा अडथळा टळला आणि किडणी प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी झाला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Doctor contribution, Kidney sell, Science

    पुढील बातम्या