मराठी बातम्या /बातम्या /heatlh /दुधासोबत कधीच खाऊ नयेत 'हे' पाच पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

दुधासोबत कधीच खाऊ नयेत 'हे' पाच पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

काही पदार्थांचं काही विशिष्ट पदार्थांसह केलेलं सेवन विषासमान मानलं जातं. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

काही पदार्थांचं काही विशिष्ट पदार्थांसह केलेलं सेवन विषासमान मानलं जातं. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

काही पदार्थांचं काही विशिष्ट पदार्थांसह केलेलं सेवन विषासमान मानलं जातं. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

    नवी दिल्ली 10 जुलै : आपलं शरीर हे एका मशीनसारखं आहे. त्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाचा शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. शरीराचं आरोग्य चांगलं (Good Health) राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो आहार. शारीरिक वाढ, पोषणासाठी सर्वोत्तम आहार (Best Diet) घेणं आवश्यक असतं. आहार हेदेखील एक शास्त्र आहे. कोणत्या पदार्थाबरोबर कोणता पदार्थ खाणे योग्य आहे, हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.

    काही पदार्थांचं काही विशिष्ट पदार्थांसह केलेलं सेवन विषासमान मानलं जातं. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूध हे पोषणासाठी खूप आवश्यक आहे; पण दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कित्येक जणांना दूध (Milk) नुसतं प्यायला आवडत नाही. त्याची चव आवडत नाही. म्हणून त्यामध्ये त्यांच्या आवडीचे काही पदार्थ मिक्स करून ते प्राशन केलं जातं; पण त्याच्या परिणामांची त्यांना कल्पना नसते. आयुर्वेदानुसार (Ayurveda) दूध हे थंड गुणधर्माचं असतं. त्यामध्ये त्याविरुद्ध स्वरूपाच्या म्हणजे उष्ण गुणधर्माच्या पदार्थांचं मिश्रण केलं गेलं तर त्याचा शरीरावर होणारा परिणाम गंभीर असतो.

    'हिरवं सोनं' तुम्हाला बनवू शकेल लखपती, सरकारकडून मिळेल अनुदान; वाचा सविस्तर

    खालील काही पदार्थ दुधासोबत सेवन करणं टाळायला हवं.

    बेरी किंवा चेरी (Berries of Cherries)

    ब्लू बेरी, स्ट्रॉबेरी, चेरी यांसारख्या फळांचं दुधाबरोबर सेवन केल्याने पचनप्रक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अॅलर्जीही होऊ शकते. ही फळं दुधाबरोबर खाऊ नयेत. दूध पिऊन झाल्यावर एका तासानंतर ही फळं खाल्ली तरी चालतील.

    आंबट फळांचं सेवन (Acidic Fruits)

    संत्री, अननस, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असतं. दुधाबरोबर यांचं सेवन केल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

    दह्याचं सेवन (Curd)

    दही हादेखील एक आम्लधर्मी पदार्थ आहे. आयुर्वेद सांगतो, की दुधासोबत दही कधीही खाऊ नये. दुधासोबत त्याचं सेवन केल्याने पचनप्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

    'मला सर नाही, बॉस म्हणायचं;' VIRAL VIDEO मुळे चर्चेत आले नवे रेल्वेमंत्री

    खारट पदार्थ (Salted)

    दुधासोबत कधीच खारट पदार्थ खाऊ नयेत. हे दोन्ही वेगळ्या गुणधर्माचे पदार्थ असल्याने त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं नसतं. काही जण बिस्किटं किंवा खारे पदार्थ दुधात मिसळून खातात.त्यांना अपचनाचा त्रास होऊ शकतो.

    मटण, मांस यांसारख्या मांसाहारी पदार्थांचं सेवन (Meat)

    मटण आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. ते दोन्ही एकत्र करून खाल्ल्यास पचनप्रक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यांमुळे मांसाहारी पदार्थ कधीच दुधासोबत खाऊ नयेत.

    आरोग्य चांगलं राखण्यासाठी दुधासोबत वरील पदार्थांचं सेवन अवश्य टाळावं.

    First published:

    Tags: Dangerous milk combinations, Food, Health Tips, Milk combinations