मराठी बातम्या /बातम्या /heatlh /पालकांनो Alert! मोबाईल घेईल तुमच्या चिमुकल्यांचा जीव; 13 वर्षांच्या मुलासोबत भयानक घडलं

पालकांनो Alert! मोबाईल घेईल तुमच्या चिमुकल्यांचा जीव; 13 वर्षांच्या मुलासोबत भयानक घडलं

मोबाईलमुळे मुलाचा जीव धोक्यात पडला. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

मोबाईलमुळे मुलाचा जीव धोक्यात पडला. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

13 वर्षांचा मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. त्यानंतर त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ, 11 डिसेंबर :  हल्ली मुलं मोबाईलशिवाय राहतच नाही. तुमची मुलंही तुमच्याकडे मोबाईलसाठी हट्ट करतात. काही वेळा तर मुलं जेवावीत किंवा शांत राहावीत आणि आपल्यााल काम करायला मिळावं म्हणून पालकच स्वत: त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही हीच चूक करत असाल तर सावध व्हा. कारण मोबाईल डोळे, आरोग्यावर तसे दुष्परिणाम आहेतच. पण आणखी एक भयानक परिणाम होऊ शकतो जो तुमच्या मुलांच्या थेट जीवावरही बेतू शकतो.

उत्तर प्रदेशच्या मथुरामधील ही घटना आहे. 13 वर्षांच्या मुलासोबत मोबाईलमुळे जे घडलं ते धक्कादायक आहे. मेवाती परिसरात राहणारा मोहम्मद जुनैद घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता. अचानक घरात ब्लास्ट झाल्यासारखा आवाज झाला. आवाज ऐकून सर्वजण घाबरले आणि आवाजाच्या दिशेने पळाले. पाहतात तर काय... जुनैद जखमी अवस्थेत पडला होता आणि मोबाईल पूर्णपणे फुटून कोळशासारखा काळा झाला होता. गेम खेळत असतानाच जुनैदच्या हातात अचानक मोबाईलचा स्फोट झाला.

हे वाचा - तुमच्या मुलांना तर तुम्ही दिलं नाहीये ना हे खेळणं? 4 वर्षांच्या चिमुकलीच्या आतड्यांना पडले छिद्रच छिद्र

जुनैद गंभीररित्या भाजला गेला. त्याच्या हात आणि तोंडाला जखम झाली आहे. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्यावर सर्वात आधी प्रथमोपचार करून त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. डॉक्टर टिकेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं की, मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्यावर उपचार करण्याआधी अलट्रासाऊंड केलं जातं आहे. त्यावरून त्याची नेमकी स्थिती समजेल. त्याच्या हृदयाजवळ जास्त जखम झाली आहे.

जुनैदचे वडील मोहम्मद जावेद यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी एमआय कंपनीचा मोबाईल घेतला होता. त्यात कोणतीच समस्या नव्हती. पण अचानक हा मोबाईलचा स्फोट कसा झाला काहीच समजत नाही आहे.

हे वाचा - शाळकरी मुलांना स्टंटबाजी पडली महागात, अंगाला आग लागली आणि...

मोबाईलचा ब्लास्ट होण्याची बरीच कारणे असू शकतात. पण काही असलं तरी मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. जुनैदचं नशीब म्हणावं म्हणून त्याच्या जीवावर बेतलं नाही. पण प्रत्येक वेळी नशीब असं साथ देईलच असं नाही. त्यामुळे तुमच्या मुलांवर अशी वेळ येऊ देऊ नका. आताच सावध व्हा.

First published:

Tags: Health, Lifestyle, Mobile, Parents, Parents and child, Small child, Uttar pradesh