कोरोना करतोय मेंदूवर परिणाम, डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष

कोरोना करतोय मेंदूवर परिणाम, डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष

दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना सध्या डोकेदुखी (Headache) आणि डोक्याशी संबंधित (Brain related illness) इतर आजार होत असल्याचं दिसून आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जुलै : देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरली असून तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना सध्या डोकेदुखी (Headache) आणि डोक्याशी संबंधित (Brain related illness) इतर आजार होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तीन आठवड्यात रुग्ण बरे होत असले, तरीसुद्धा शरीरातील अनेक अवयवांवर हा विषाणू दीर्घकालीन परिणाम (Long term effects) करत असल्याचं दिसून आलं आहे.

डोकेदुखीची समस्या

कोरोना होऊन गेल्यानंतर अनेक रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा ही डोकेदुखी सामान्य आहे, असं रुग्णांना वाटतं. मात्र ते मेंदुच्या मोठ्या विकाराचं लक्षण असू शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अनेकदा ही सामान्य डोकेदुखी आहे की कोरोनामुळे झालेली डोकेदुखी आहे, यातील फरक ओळखणं डॉक्टरांनाही शक्य होत नसल्याचं सांगितलं जातं. मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर वारंवार डोकं दुखत असेल, तर ते न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

लकवा मारण्याच्या प्रमाणात वाढ

कोरोनावर उपचार घेत असताना आणि उपचार घेऊन बरे झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेकांना लकवा मारल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. हा अर्धांगवायूचा झटका रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे होत असल्याचं डॉक्टर सांगतात. रक्तनलिका  ब्लॉक होणं किंवा फाटणं या कारणांमुळे असे प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे.

हे वाचा -BMC नं घातली बकऱ्यांच्या कुर्बानीवर मर्यादा, आक्षेप घेणारी याचिका फेटाळली

डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको

कोरोना होऊन गेल्यानंतर सतत डोकं दुखत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आपली डोकेदुखी ही सामान्य असेल, असं समजून रुग्ण घरीच उपचाराविना थांबल्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे सलग काही दिवस डोकेदुखी कमी होत नसेल, तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Published by: desk news
First published: July 21, 2021, 6:27 PM IST

ताज्या बातम्या