मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Night Leg Pain : रोज रात्री पायांमध्ये होतात वेदना; करा हे घरगुती उपाय, मिळेल त्वरित आराम

Night Leg Pain : रोज रात्री पायांमध्ये होतात वेदना; करा हे घरगुती उपाय, मिळेल त्वरित आराम

सध्याच्या काळात लोक त्यांच्या कामाच्या इतक्‍या तणावाखाली राहतात की ते स्वतःकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. अनेकवेळा झोपायला गेल्यावर पाय दुखायला लागतात. ज्यामुळे झोपही लागत नाही. हे पायांचे दुखणे माणसाला हैराण करून सोडते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 8 ऑगस्ट : तुमचे पाय दिवसभर खूप काम करतात. चालणे असो किंवा बराच वेळ उभे राहणे असो. सध्याच्या काळात लोक त्यांच्या कामाच्या इतक्‍या तणावाखाली राहतात की ते स्वतःकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. अनेकवेळा काम उरकून बेडवर झोपायला गेल्यावर पाय दुखायला लागतात. ज्यामुळे झोपही लागत नाही. हे पायांचे दुखणे माणसाला हैराण करून सोडते. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्हाला या पायांच्या दुखण्यापासून अराम देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. मोहरीचे तेल झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, रोज रात्री होणारी पायदुखी कमी करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर असते. रात्री मोहरीचे तेल कोमट करून पायाला मसाज करा. यामुळे तुम्हाला पाय दुखण्यात खूप आराम मिळेल.

Sleeping On Chair : खुर्चीत बसून झोपणं चांगलं की वाईट? आरोग्यावर कसा होतो परिणाम?

मेथी मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मेथी एक चांगले पेनकिलर म्हणून काम करते. यासाठी एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठून रिकाम्या पोटी हे पाणी प्या. तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा चमचाभर मेथीचे दाणे देखील चावून खाऊ शकता. असे केल्याने तुम्ही पायदुखीपासूनही सुटका मिळवू शकता. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि मध अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पायदुखी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. याचे कारण म्हणजे यात वेदनाशामक गुणधर्म आहेत. ज्यामुळे पायांची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी एका कपमध्ये दोन चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि अर्धा चमचा मध मिसळून तुम्ही ते रिकाम्या पोटी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला पायदुखीपासून आराम मिळेल. थंड आणि गरम शेक शेकल्यामुळे वेदनांमध्ये खूप आराम मिळतो. पायावर बर्फ लावल्याने पायांचे दुखणे कमी होते. यासाठी कोणत्याही पिशवीत बर्फ भरा आणि पायाच्या ज्या भागात दुखत असेल तिथे लावा. तुम्ही गरम पाण्यानेही पाय शेकू शकता. यासाठी पाण्याच्या पिशवीत गरम पाणी भरून घ्या आणि त्याने पायांना शेक द्या. कोणत्या प्रकारचे शेकणे आपल्यासाठी योग्य आहे हे आपल्या वेदनांच्या कारणावर अवलंबून असते. How to Control BP : औषधांशिवायही नियंत्रित राहू शकतं ब्लडप्रेशर; करा हे सोपे उपाय योगा रोज योगा केल्याने पाय दुखण्यात खूप आराम मिळेल. योगासने केल्याने आपल्या शरीरात रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीर लवचिक बनते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पायात किंवा तुमच्या शरीरात कुठेही दुखत असेल तर योगाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. पायातील पेटके कमी करण्यासाठी तुम्ही बाउंड अँगल, डॉल्फिन, ईगल किंवा एक्स्टेंडेड साइड अँगल हे प्रकारदेखील करू शकता.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Pain

पुढील बातम्या