मराठी बातम्या /बातम्या /heatlh /डान्स करा, ताण विसरा; पाहा zumba dance करण्याचे मोठे फायदे

डान्स करा, ताण विसरा; पाहा zumba dance करण्याचे मोठे फायदे

झुम्बामध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉपसारख्या विविध नृत्य शैलींचा समावेश आहे.

झुम्बामध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉपसारख्या विविध नृत्य शैलींचा समावेश आहे.

झुम्बामध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉपसारख्या विविध नृत्य शैलींचा समावेश आहे.

  मुंबई 21 जुलै: शरीर आणि मन निरोगी राहावं यासाठी व्यायाम अत्यावश्यक असतो, मात्र आजच्या धकाधकीच्या काळात कामाच्या अनिश्चित वेळा, कामाचा ताण, यामुळं अनेकांना व्यायामासाठी वेळ काढणं किंवा त्यासाठी जिममध्ये जाणे शक्य होतं नाही. तसंच अलीकडे आहारातील असंतुलन, बैठं काम अशा अनेक कारणांमुळे वाढत्या वजनाची आणि त्यामुळं होणाऱ्या इतर आजारांची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं दिसत आहे. लहान वयातच अनेकांना अती लठ्ठपणाच्या आव्हानाला तोंड द्यावं लागत आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर अनेक लोक घरी राहून काम करत असल्यानंही वजन वाढण्याची समस्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगेवेगळ्या प्रकारचे डाएट(Diet), व्यायामाचे प्रकार अवलंबत आहेत. यासाठी ऑनलाइन क्लासेसही सुरू झाले आहेत.

  वजन कमी करण्यासाठी गेल्या काही काळापासून लोकप्रिय झाला आहे तो झुम्बा डान्सशी संबंधित व्यायाम प्रकार (Zumba Workout). काही लोकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करणं आवडतं, तर काहींना आवडत नाही. काही लोकांना घरच्या घरी हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणं आवडतं. अशा लोकांना झुम्बा हा प्रकार आवडतो. हा एक प्रकारचा नृत्य व्यायाम (Zumba Dance Workout ) असल्यानं तो मनोरंजक असतो. यात नृत्यातील हालचाली प्रमाणे हालचाली करायच्या असतात. या व्यायामामुळे स्नायू (Muscles) मजबूत होतात. कॅलरी(Calorie) जळण्यास आणि चरबी कमी होण्यासही याची चांगली मदत होते. या व्यायामामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. मनालाही उत्साह वाटतो.

  भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी घातक; खरेदी करताना घ्या 'ही' काळजी

  झुम्बा व्यायाम प्रकार म्हणजे नेमकं काय ?

  झुम्बामध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉपसारख्या विविध नृत्य शैलींचा समावेश आहे. यात तालबद्ध, लयबद्ध शारीरिक हालचाली केल्या जातात. या गतिमान हालचालींमुळे स्नायूंमधील रक्ताभिसरण(Blood Circulation) सुधारतं, त्यामुळे स्नायू अधिक मजबूत होतात. हा व्यायाम प्रकार सुरू केल्यानंतर काही आठवड्यांतच तुम्हाला याचे फायदे दिसून येतील.

  ताण कमी होतो : झुम्बा हा एक नृत्य व्यायाम प्रकार असल्यानं त्यामुळे शरीरात सेरोटोनिन या फील-गुड हार्मोनचे(Feel Good Hormone) उत्पादन वाढविण्यात मदत होते. त्यामुळे तुम्हाला उत्साहवर्धक वाढते. परिणामी मानसिक तणावही कमी होतो. त्याचे चांगले परिणाम शरीरावरही दिसून येतात. शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

  भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी घातक; खरेदी करताना घ्या 'ही' काळजी

  रक्तदाब नियंत्रित राहतो : झुम्बा केल्यानं शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या निरोगी होतात. अशा रक्तवाहिन्यांमधून रक्ताचा प्रवाह योग्यरीतीनं वाहतो. त्यामुळं रक्तदाबाची(Blood Pressure) समस्याही कमी होतं.

  कॅलरीज जळण्यास मदत होते : झुम्बा हा कार्डिओ व्यायाम (Cardio Exercise) मानला जातो. या व्यायामानं सर्व स्नायू सक्रिय होतात आणि हृदयाची गतीदेखील वाढते. त्यामुळे कॅलरी जळण्यास(Calorie Burn) मदत होते. परिणामी शरीरात साठलेली चरबी कमी होते. त्यामुळे वजन वेगानं कमी होतं.

  First published:
  top videos

   Tags: Dance video, Health Tips