मराठी बातम्या /बातम्या /heatlh /ऑपरेशनशिवाय बरा होईल Knee Arthritis; या आहेत उपचारांच्या पद्धती

ऑपरेशनशिवाय बरा होईल Knee Arthritis; या आहेत उपचारांच्या पद्धती

सर्जरीशिवाय नी आर्थरायटिसवर उपचार.

सर्जरीशिवाय नी आर्थरायटिसवर उपचार.

गुडघ्याचं दुखण्यातून आराम हवा असतो. पण गुडघ्याची शस्त्रक्रिया म्हटली की अनेकांना भीती वाटते. पण शस्त्रक्रियेशिवाय उपचार कसे शक्य आहेत, यावर डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Bangalore, India

  मूलभूत तत्त्वं :

  - शिक्षण आणि जीवनशैलीत सुधारणा

  - शरीराचं वजन नियंत्रित राखणं

  - लठ्ठ किंवा अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी पुरेशा मल्टिडिसिप्लिनरी असेसमेंटनंतर वेट लॉस प्रोग्रामची अंमलबजावणी करावी.

  काँझर्व्हेटिव्ह ट्रीटमेंट :

  1. भौतिक घटक : गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थ्रायटिसवर उपचार करण्यायासाठी फिजिकल एजंट्स अर्थात भौतिक घटकांचा वापर करण्याचा विचार करा. इंटरफेरेन्शियल थेरपी, लेसर थेरपी, मॅग्नेटोथेरपी, व्हायब्रेशनल एनर्जीचा वापर हे सर्वांत प्रभावी फिजिकल एजंट्स आहेत.

  2. थेरापेटिक शारीरिक व्यायाम : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या पेशंटवर उपचार करताना थेरापेटिक शारीरिक व्यायामांची शिफारस केली जाते. हे व्यायाम घरीही करता येतात.

  3. मन-शरीराचे व्यायाम : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या पेशंटवर उपचार करताना थेरापेटिक दृष्टिकोनातून माइंड-बॉडी एक्सरसाइजेस म्हणजेच मन-शरीराचे व्यायाम (उदा. हठयोग) विचारात घेतले जाऊ शकतात.

  4. स्नायूंना मजबुती देणारे व्यायाम : गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थ्रायटिसवर उपचार करण्यासाठी स्नायूंना मजबुती देणाऱ्या व्यायामांची शिफारस केली जाऊ शकते. अन्य व्यायामप्रकारांसोबत किंवा त्याशिवायही ते सुचवले जाऊ शकतात. त्यात एक्सरसाइज प्रोग्रामचा कालावधी, काँट्रॅक्शन्स आणि रेझिस्टन्सचे प्रकार, पर्यवेक्षणाची पद्धत आणि तीव्रता हे निकष लक्षात घेतले जाऊ शकतात.

  हे वाचा - खरंच हा 'कंबल वाले बाबा'चा चमत्कार? रुग्णावर घोंगडी टाकून आजारातून मुक्त केल्याचा दावा

  5. एरोबिक व्यायाम : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुधारणा व्हावी, शारीरिक कार्यपद्धती सुधारावी, तसंच वेदना कमी व्हाव्यात, यासाठी एरोबिक व्यायामाच्या छोट्या प्रोग्रामचा विचार केला जाऊ शकतो. हे व्यायाम स्नायू मजबुतीसाठीच्या व्यायामांसोबत किंवा त्याशिवायही केले जाऊ शकतात.

  6. हायड्रोकिनेसीथेरपी : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी या थेरपीचा वापर केला जाऊ शकतो.

  7. बाल्निओथेरपी : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या रुग्णांना वेदनांपासून दिलासा मिळावा आणि आर्टिक्युलर फंक्शनिंग व्हावं, यासाठी अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वरूपात अन्य थेरपीसोबत बाल्निओथेरपी वापरली जाते.

  8. अ‍ॅक्युपंक्चर : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी अ‍ॅक्युपंक्चरचा वापर करण्यासंदर्भात सध्या फार कमी विश्वासार्ह पुरावे उपलब्ध आहेत.

  9. पटेलर टेपिंग : गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी पटेलर टेपिंगचा वापर करण्यासंदर्भात सध्या फार कमी विश्वासार्ह पुरावे उपलब्ध आहेत.

  10. इंट्रा-आर्टिक्युलर इंजेक्शन्स : - ह्यालुरॉनिक अ‍ॅसिड

  - कॉर्टिकोस्टेरॉइड्स

  - प्लेटलेट रिच प्लाझ्मा

  हे वाचा - पोटातील बॅक्टेरिया आणि नैराश्याचा काही संबंध आहे का? पाहा जिवाणूंचा शरीरावर कसा होतो परिणाम

  11. कूर्चेची (कार्टिलेज) दुखापत कमी करण्यासाठी औषधं

  - ग्लुकोसॅमाइन, काँड्रॉयटिन

  फारमॅकॉलॉजिकल उपचार :

  - तोंडावाटे द्यायची नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी औषधं

  - ऑपिऑइड्स

  - पॅरासिटामोल

  - टॉपिकल प्रीपरेशन्स

  मेकॅनिकल एड्स

  - वॉकिंग एड्स (वॉकिंग स्टिक्स, क्रचेस, वॉकिंग फ्रेम्स, इत्यादी)

  - ब्रेसेस

  - फूट ऑर्थोसेस

  लेखक - डॉ. समर्थ आर्या, कन्सलटंट ऑर्थोपेडिक्स, जॉईंट रिप्लेसमेंट अँड रोबिटिक सर्जरी, स्पर्श हॉस्पिटल, बंगळुरू

  First published:

  Tags: Health, Lifestyle