Home /News /heatlh /

Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी सांगितल्या काही खास टिप्स, वाचा

Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी सांगितल्या काही खास टिप्स, वाचा

Representative Image (Photo: Shutterstock)

Representative Image (Photo: Shutterstock)

Health News Marathi: आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात.

    मुंबई, 2 फेब्रुवारी: किडनी (Kidney) अर्थात मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा (body) सर्वात महत्वाचा भाग (important part) आहे. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड करते. आरोग्यदायी जीवन (healthy life) जगण्यासाठी मूत्रपिडांचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते, अन्यथा अनेक गंभीर आजार (serious illnesses) होऊ शकतात. मूत्रपिंडाने जर काम करणं बंद केले तर व्यक्तीचा जीव जातो. अशा परिस्थितीत, मूत्रपिंडाशी संबंधित कोणतीही समस्या हलक्याने (lightly) न घेता त्यावर योग्य उपचार करणं खूप महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक मूत्रपिंडाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. या आजारांची काही लक्षणं आहेत. त्यामध्ये शरीरात उर्जेची कमतरता, थकवा, एकाग्रता नसणं, लघवीला त्रास होणं, मूत्रपिंडामध्ये तीव्र वेदना आदींचा समावेश होतो. अनेक लोक मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी अ‍ॅलोपॅथी उपचार घेण्याऐवजी आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांवर अवलंबून असतात. तुम्हीही अ‍ॅलोपॅथीऐवजी आयुर्वेद किंवा घरगुती उपचारांना महत्त्व देत असाल तर आज आम्ही तुम्हाला मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव (Swami Ramdev) यांनी दिलेल्या टिप्सची माहिती देणार आहोत. वाचा : ‘या’ प्रोटिनमुळे भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय Diabetes चा धोका, IIT-M च्या संशोधनातून स्पष्ट मूत्रपिंड निरोगी ठेवण्याचे मार्ग - स्वामी रामदेव यांच्या मते, मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी उडीद डाळ खाणं आवश्यक आहे. - गोखरूचं पाणी घरातील सर्व सदस्यांनी महिन्यातून एकदा प्यावं, त्यामुळे किडनी स्टोन आणि त्या संबंधित आजार होत नाहीत. - क्रिएटिनीन लेव्हल वाढणं किंवा किडनी लिकेज अशा आजारांमध्ये गोखरू खूप फायदेशीर आहे. - मूठभर बार्ली (जव), मूठभर कुळिथ डाळ चार कप पाण्यात रात्री भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ती एक चतुर्थांश शिल्लक राहील एवढी शिजवून घ्या, हे मिश्रण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी घ्या. वाचा : अंडरवर्ल्डमध्ये खून करण्यासाठी सुपारी शब्दाचा वापर का केला जातो? रंजक आहे यामागची कथा आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. ज्याप्रकारे एखादी गाळणी पाण्यातील कचरा, अशुध्दी गाळून शुद्ध पाणी देतं, त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मूत्रपिंड संबंधित आजार झाल्यास घाबरून जाऊ नये. कारण आता या आजारांवर मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत. परंतू हे आजार होऊ नयेत, यासाठी वेळीच काही छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Kidney sell, Lifestyle, Wellness

    पुढील बातम्या