मुंबई, 16 सप्टेंबर : बेबी पावडर म्हटलं की सर्वात आधी समोर येते ती जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर. लहान बाळांसाठी सर्वोत्तम उत्पादने वापरली जावीत असा सगळयांचाच कटाक्ष असतो. त्यामुळे बाजारपेठेत गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीचीच उत्पादनं घेण्यास प्राधान्य दिलं जातं. याच निकषांवर लहान बाळांसाठीच्या उत्पादनांमध्ये जगप्रसिद्ध झालेला ब्रँड म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. पण याच लोकप्रिय पावडरवर सध्या अनेक देशांमध्ये बंदी घातली जाते आहे. आता महाराष्ट्रातही यावर बंदी घालण्यात आली आहे. असं या पावडरमध्ये नेमकं सापडलं तरी काय? 1984 पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचं दाखवल्यानं ही पावडर म्हणजे कंपनीचं सिंबॉल प्रॉडक्ट बनलं होतं. 1999 पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचं मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केलं जात होतं. या सगळ्यांत मुख्य प्रॉडक्ट J & J #1 अॅसेटच्या रुपात बेबी पावडर असे. गेली कित्येक वर्षे बेबी पावडर संपूर्ण जगभरात विकली जात आहे. पण या बेबी पावडरमध्ये आरोग्याला अत्यंत घातक घटक असल्याचं उघड झाल्यानं कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. बेबी पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील औषध नियंत्रण यंत्रणेनं केलेल्या तपासणीत जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या नमुन्यात कार्सिनोजेनिक क्रायसोटाइल फायबर्स आढळले. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. या पावडरमध्ये अॅस्बेटॉसचा एक धोकादायक फायबर आढळला होता. हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जात होतं. हे वाचा - कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या आरोपावरून कंपनीवर खटला दाखल केला होतं. या पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टानं कंपनीला 15 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीनं लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे, असा ठपका कोर्टानं ठेवला होता. कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये अॅस्बेस्टॉस मिसळत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला होता. कंपनीनं जो गुन्हा केला त्याची भरपाई पैशांमध्ये होऊच शकत नाही. पण हा अपराध अत्यंत मोठा आहे, त्यामुळे त्याचा दंड, शिक्षाही मोठ्याच प्रमाणात व्हायला हवी, असंही कोर्टानं थेट सुनावलं होतं. त्यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्ट्सची मागणी खूपच कमी झाली होती. विक्री कमी झाल्याच्या कारणावरून कंपनीनं 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद केली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये (UK) कंपनीच्या भागधारकांनी एकत्र येऊन या पावडरच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार केला. PH प्रमाणिक मानकानुसार नाही अमेरिकेतही या पावडरवर बंदी आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पावडरची चाचणी भारतात केली गेली. कोलकाताच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्याचा अहवाल समोर आला आहे. हे वाचा - रिफाइंड तेलाचा अतिरिक्त वापर शरिरासाठी आहे अपायकारक, रोज इतकेच वापरा! त्यामध्ये दोष आढळले आहेत. यामध्ये PH प्रमाणिक मानकानुसार नाही असं सांगण्यात आलं आहे. यामुळे लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनीच्या या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.