मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंग योग्य की अयोग्य? जाणून घ्या, तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंग योग्य की अयोग्य? जाणून घ्या, तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगमुळे मुलाची प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आई आणि बाळामधील प्रेम वाढते. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान वाढलेलं वजन कमी करण्यास ब्रेस्टफीडिंगमुळे मदत होते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगमुळे मुलाची प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आई आणि बाळामधील प्रेम वाढते. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान वाढलेलं वजन कमी करण्यास ब्रेस्टफीडिंगमुळे मदत होते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगमुळे मुलाची प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आई आणि बाळामधील प्रेम वाढते. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान वाढलेलं वजन कमी करण्यास ब्रेस्टफीडिंगमुळे मदत होते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : आईचे दूध बाळांसाठी सर्वात आवश्यक आहे. ते बाळांसाठी अमृत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आईच्या दुधातून बाळाला आवश्यक ते सर्व पोषण मिळतं. अशा परिस्थितीत प्रत्येक आईने स्तनपानाचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. माता सहसा आपल्या बाळाला किमान वर्षभर स्तनपान देतात. परंतु जेव्हा स्तनपान वर्षभरानंतरही चालू राहते तेव्हा त्याला एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंग (Breastfeeding) म्हणतात. यामध्ये 2 ते 4 वयोगटातील मुलांना स्तनपान करण्याचा समावेश आहे. एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा आठवडा दरवर्षी World Breastfeeding Week म्हणून पाळला जातो.

कोणत्याही स्त्रीचं शरीर तिच्या बाळासाठी आवश्यक दूध तयार करू शकत असेल, तर बाळाला जास्त काळ स्तनपान देण्यास हरकत नाही. पण याबद्दल अनेक गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगचे फायदे आणि ब्रेस्टफीडिंग कधी थांबवायला हवं, याबद्दलची माहिती देणार आहोत,

boldsky.comने या संदर्भात वृत्त दिलंय.

बाळांसाठी एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगचे फायदे

आईच्या दुधातून बाळांना अनेक पोषकतत्त्वं मिळतात. त्यामुळे मुलांच्या शरीराला रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळते. बाळाच्या वाढत्या गरजांसाठी आईचं दूध योग्य प्रमाणात पोषकतत्त्वं पुरवतं. यामुळे लहान मुलांना मोठ्या झाल्यानंतर होणाऱ्या आजारांचा धोकाही कमी होतो. याशिवाय आईचं दूध प्यायल्याने बाळ हायड्रेट (hydrate) राहतं, त्याचं पोटही भरलेलं असतं, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोकाही कमी होतो. तसंच बाळ आजारी असेल, ते काही खात नसेल तर आईच्या दुधातून त्याला आवश्यक पोषण मिळतं. तसंच स्तनपानामुळे बाळाचे आईशी पक्के भावनिक बंध निर्माण होतात.

आईसाठी एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगचे फायदे

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंगमुळे मुलाची प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आई आणि बाळामधील प्रेम वाढते. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान वाढलेलं वजन कमी करण्यास ब्रेस्टफीडिंगमुळे मदत होते. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer), ओव्हरियन कॅन्सर आणि कार्डिओव्हॅस्कुलर अशा गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. मासिक पाळी उशिरा येणं हा ब्रेस्टफीडिंगचा दुष्परिणाम आहे. दीर्घकाळ ब्रेस्टफीडिंग करत राहिल्यास मातांना मासिक पाळीमुळे होणारी वेदना आणि ब्लोटिंगपासून आराम मिळतो.

एक्सटेंडेड ब्रेस्टफीडिंग यशस्वी करण्यासाठी टिप्स

नर्सिंग ब्रा निवडणं ही ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची साईझ आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन योग्य ब्रा निवडा. तसंच दूध पाजताना बाळाने चावल्यास त्याचं दूध सोडवण्याऐवजी त्याचं लक्ष इतर ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि काही वेळ थांबून पुन्हा दूध पाजा. साधारणपणे आई जेव्हा बाळाला सतत दूध पाजते तेव्हा तिच्या शरीरात दुधाची कमतरता कधीच भासत नाही. म्हणून आपल्या मुलाशी प्रेमाने वागा आणि योग्य पद्धतीने व्यवस्थित स्तनपान द्या.

बाळाला दूध देणं कधी थांबवावं

दूध पिताना जर बाळ तुम्हाला सतत चावत असेल तर ते स्तनपान थांबवणं योग्य असल्याचं लक्षण आहे. तसंच जर तुम्ही कामानिमित्त जास्त वेळ बाहेर आणि बाळापासून लांब राहत असाल तर बाळाचं स्तनपान बंद करून त्याच्यासाठी योग्य आहार सुरू करणं योग्य राहील. याशिवाय, जर स्तनांमधून दूध येत नसेल आणि बाळाला दूध देताना स्तन दुखत असतील तर बाळाला दूध देणं थांबवणं योग्य ठरेल.

First published:

Tags: Health, Health Tips