Home /News /heatlh /

खाणंपिणं व्यवस्थित असतानाही Constipation चा त्रास; मग या समस्येला हलक्यात घेऊ नका

खाणंपिणं व्यवस्थित असतानाही Constipation चा त्रास; मग या समस्येला हलक्यात घेऊ नका

लिंबू पाणी पाचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस,बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांमध्ये दिलासा मिळतो.

लिंबू पाणी पाचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस,बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांमध्ये दिलासा मिळतो.

सामान्यपणे आपली बदलेली लाईफस्टाईल बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्येला जबाबदार असते. पण याशिवायही बरीच कारणं आहेत.

    मुंबई, 29 मे : आजच्या फास्ट लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) बद्धकोष्टाचा (Constipationत्रास (Problemहोणं सामान्य गोष्ट बनली आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी (Wrong eating habits)तणाव आणि योगाभ्यास न करणं यामुळे बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येशी लढत असतात. पण अनेकदा जीवनशैली व्यवस्थित असूनही या समस्येचा सामना करावा लागतो, त्यावेळी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण हे गंभीर आजाराचं लक्षणं आहे.  आपली खराब झालेली जीवनशैली तीव्र बद्धकोष्ठतेस जबाबदार असू शकते. पचायला जड असलेले मांसाहारी पदार्थ खाणं, प्रोसेस्ड फूड, कमी फायबर असलेला आहार यामुळे ही समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त, पाणी कमी पिणं, मद्यपान आणि व्यायाम न केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पण, जीवनशैली योग्य असेल आणि तरीही बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर यामागे नेमकी काय कारणं आहेत पाहुयात. थायरॉईडचा त्रास थायरॉईड ग्रंथी शरीरात पुरेसं हार्मोन्स तयार करण्यास सक्षम नसतात, तेव्हा त्याचा चयापचयवर खूप वाईट परिणाम होतो. ज्यामुळे पचन क्रियेवरही परिणाम होतो आणि बद्धकोष्ठता होते. याशिवाय थकवा, थंडावा सहन न होणं, कोरडी आणि संवेदवनशील त्वचा,वजन कमी होणं, केस गळणं, नखं तुटणं, स्मरणशक्ती कमी होणं, चेहरा सुजणं, महिलांमध्ये अनियमित पाळी असे त्रास होऊ लागतता. (हळदीचं अतिसेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक, वाचा दुष्परिणाम) डायबेटीज डायबेटीजमध्ये शरीरातील इन्सुलिन हार्मोन बनणं थांबतं. ज्यामुळे शरीरात बरेच बदल होतात. यापैकी एक म्हणजे मज्जातंतूचं नुकसान यामुळे चयापचयावर परिणाम होतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठते व्यतिरिक्त, मधुमेही रुग्णांमध्ये थकवा, वजन कमी होणं, नजर कमी होणं आणि नेहमी तहान लागणं, रात्री वारंवार लघवी होणं यासारख्या समस्या असतात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) देखील बद्धकोष्ठतेचं कारण ठरू शकतं. इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, पण त्यामुळे आपल्या मेंदू आणि आतड्यांचं कार्य बिघडतं. पोटदुखी, पोटात गोळा येणं, पोट फुगणं, कधीकधी अचानक लूज मोशन होणं ही या त्रासाची लक्षणं आहेत. (केंद्र सरकार देत आहे 5 लाख रुपये जिंकण्याची संधी, 25 जूनआधी करावं लागेल हे काम) चिंता आणि डिप्रेशन जेव्हा आपण खूप ताण घेता तेव्हा आपलं शरीर खूप वेगळ्या प्रकारे कार्य करतं. त्यावेळी आपल्या पचन संस्थेचं काम चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे डिप्रेशनदेखील बद्धकोष्ठतेचं एक कारण असू शकतं. बर्‍याच वेळा डिप्रेशनमध्ये लोक निराशा, थकवा किंवा आत्महत्येचे विचार मनात येण्याने दिवसभर अंथरुणावर पडून राहतात, ज्यामुळे पचनावर वाईट परिणाम होतो आणि बद्धकोष्ठता होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Stomach, Stomach pain

    पुढील बातम्या