मुंबई, 24 मे : उन्हाळा हा ऋतू कडक ऊन आणि उकाड्यामुळे त्रासदायक वाटतो. त्यातही दरवर्षी अनेकांना उन्हाळ्याची एका कारणामुळे प्रतीक्षा असते. ते कारण म्हणजे आंबा. आंब्यासाठी (Mangeo) सर्वजण उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्यात आमरस, कच्च्या कैरीपासून केलेल्या पदार्थांची मेजवानी असते. आंब्यामध्ये पोषकतत्त्व असली तरीही त्याचं अतिसेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. कुठलाही पदार्थ अति खाल्ला तर त्रास होतोच. आंब्याचं साल आणि त्याची पानं ही पण शरीराला पोषक तत्त्व देतात. आयुर्वेदशास्रात पदार्थ खाण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला आंबे खाण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आंबे खाल्ल्याचा आनंद मिळेलच पण तुमचं पोटही बिघडणार नाही. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केली आहे.
आंबे खाण्याचे फायदे
- मधुमेह, ओबेसिटी आणि हार्ट प्रॉब्लेमसाठी (Heart Problems) आंब्याच्या पानांच्या पावडरचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. वजन कमी (Weight Loss) करण्यासही या पावडरची मदत होते.
- आंब्याच्या रसात चिमुटभर सूंठ आणि अर्धा चमचा गाईचं तूप मिसळा. यामुळे गॅस, सांधेदुखी आणि कफाची समस्या होणार नाही. तसंच पिकलेले आंबे खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत होते.
- आंब्याच्या पानांची पावडर आणि आंब्याच्या सालींचेही अनेक फायदे आहेत. आंब्याच्या पानांमध्ये इंट्राइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. तसंच यामध्ये आढळणारे अँटि-ऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
- पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारख्या (Parkinsons and Alzheimer) आजारांची प्रक्रिया मंद करण्यासाठीही आंब्याच्या पानांचा वापर केला जातो.
- आंब्याची साल पाण्याने नीट स्वच्छ करून सावलीत वाळवून त्याची पावडर करावी. ही पावडर फेसपॅक (Face pack) म्हणूनही वापरली जाते. हा उपाय सूर्याच्या यूव्ही किरणांचे वाईट परिणाम कमी करतो. याशिवाय या पावडरमध्ये जीवनसत्त्वं आणि फायबरदेखील आढळतात.
Health Care In Monsoon: पावसात भिजल्यावर पहिलं काम हे करा, पडणार नाही आजारी
आंबे खाताना 'हे' 'टाळा
- या ऋतूत आंब्यापासून मँगो शेक (Mango Shake) तयार करून त्यात आईस्क्रीम (Ice Cream) किंवा श्रीखंड टाकून ते खाल्लं जातं. परंतु हे सर्व पदार्थ शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. आयुर्वेद आणि जैन शास्त्रांमध्ये दूध आणि फळं एकत्र करू नयेत, आंबा आणि दूधासोबत खाणं हे ‘स्लो पॉयझन’ आहे असं म्हटलं आहे.
- अस्थमाच्या रुग्णांनी आंब्यासोबत दूध (Mango with Milk) घेणं टाळावं. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणखी वाढतो. आंब्यासोबत दूध पचायला जड असतं. तसंच आंबा खाण्यापूर्वी तो 4 ते 5 तास पाण्यात बुडवून ठेवा.
- आंब्याचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास मुरुम, पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात, तसंच शरीरात उष्णता वाढण्याचाही धोका असतो.
- फ्रीजमध्ये ठेवलेला आंब्याचा रस खाल्ल्याने कफ वाढतो. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हा कफ आणखी वाढतो. त्यामुळे आंबा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये.
- तयार विकतचा आमरसामध्ये मीठ आणि साखर मिसळली जाते, यामुळे शरीराचे आणखी नुकसान होते. शक्यतो रेडिमेड आमरस खाऊ नये.
फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या आंब्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, कोणत्याही पदार्थांचं अतिसेवन करणं, हानिकारक असतं तेच आंब्याच्या बाबतीतही आहे. त्यामुळे आंबे सेवन करताना वर दिलेल्या काही बाबींचं पालन केल्यास त्याचे शरीरावर वाईट परिणाम होणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Summer season