मुंबई, 24 मे : देशात मान्सूनने (Monsoon) आगमन केलं नसलं तरी मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसातच आता मान्सूनचा पाऊस देखील सुरू होईल. अशा परिस्थितीत अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलंही खेळताना दिसत आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर गंभीरपणे आजारी (diseases) पडण्याची शक्यता असते. कारण, सर्वात जास्त संसर्गजन्य आजाराचं प्रमाण याच ऋतुत वाढत असतं.
पावसाळा हा अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. या मोसमात सर्दी-खोकला ते विषाणू, डेंग्यू, मलेरिया (Dengue and Malaria) असे आजार होतात. म्हणून, आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कधी पावसात भिजत असाल तर काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवू शकता.
पावसात भिजल्यानंतर लगेच कराव्या अशा 5 गोष्टी
कपडे बदलणे
पहिली गोष्ट म्हणजे ओले झाल्यावर लगेच कपडे बदलणे. यामुळे तुमच्या शरीराला जास्त थंडी जाणवणार नाही आणि शरीराचे तापमान सामान्य होईल. यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन टाळाल.
आल्याचा चहा किंवा काढा
पावसात भिजल्यानंतर लगेच गरम हळदीचे दूध किंवा आल्याचा चहा, कॉफी प्यावी. जर तुम्हाला जास्त उष्णता हवी असेल तर तुम्ही काढा देखील पिऊ शकता. ताप आणि सर्दी टाळण्यासाठी, आपण काहीतरी गरम खावे.
पावसाळ्यात घर, संसाराचं नुकसान टाळायचं असेल आजच 'या' गोष्टींची तयारी करा
पाय कोरडे करा
जर तुम्ही पावसात शूज घातले आणि तुम्ही भिजत असाल तर लगेचच तुमचे पाय स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. त्यानंतर पाय स्वच्छ आणि कोरडे करा.
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारी क्रिम लावा
पावसात भिजल्यावर कपडे बदलताना काही अँटीबॅक्टेरियल क्रीम जरूर वापरा. यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारी क्रीम लावा. यामुळे आपण त्वचा ऍलर्जी आणि संक्रमण टाळू शकता. यामुळे खरुज आणि खाज येण्याची समस्या होणार नाही.
आपले डोके झाका
जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही ओले होणार आहात तेव्हा तुमचे डोके व्यवस्थित झाकून घ्या. अंगावरचे पहिले पावसाचे पाणी डोक्यावर येते. डोके खूप मऊ असते, थंडी वाजली की डोक्यात थंडी येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.