मराठी बातम्या /बातम्या /heatlh /ऑपरेशन दरम्यान डॉक्टर का परिधान करतात हिरवं कापड? तर इतर वेळी यामुळे वापरतात सफेद कोट

ऑपरेशन दरम्यान डॉक्टर का परिधान करतात हिरवं कापड? तर इतर वेळी यामुळे वापरतात सफेद कोट

तुम्हालाही डॉक्टरांच्या कपड्यांविषयी (Doctors Dress Coad) काही प्रश्न पडलेत का ? सफेद रंगाचा कोट (White Coat) आणि ऑपरेशनसाठी हिरवे कपडे का घालतात?

तुम्हालाही डॉक्टरांच्या कपड्यांविषयी (Doctors Dress Coad) काही प्रश्न पडलेत का ? सफेद रंगाचा कोट (White Coat) आणि ऑपरेशनसाठी हिरवे कपडे का घालतात?

तुम्हालाही डॉक्टरांच्या कपड्यांविषयी (Doctors Dress Coad) काही प्रश्न पडलेत का ? सफेद रंगाचा कोट (White Coat) आणि ऑपरेशनसाठी हिरवे कपडे का घालतात?

    नवी दिल्ली, 10 जून: रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचं आयुष्य वेगळं असत. 24 तास ड्युटी, सततचा ताण, ठराविक कपडे त्यांचा घालावे लागतात. आपण रुग्णालयात गेल्यावर आपल्याला तिथल्या वातावरणातला वेगळेपणा जाणवतो. तिथल्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की, डॉक्टर नेहमी सफेद रंगाचा कोटच (White Color Coat) का घालतात किंवा ऑपरेशन (Operation) करताना हिरव्या रंगाचे कपडे का असतात?

    डॉक्टर सफेद कोट का घालतात ?

    डॉक्टर सफेद कोट का घालतात ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याच्या मागे एक वेगळीच कहाणी (Story) आहे. पूर्वी एकोणीसाव्या शतकात सगळे वैज्ञानिक (Scientist) आणि प्रयोगशाळेमध्ये काम करणारे लोकं पांढऱ्या रंगाचा कोट घालायचे. त्यावेळी वैज्ञानिक डॉक्टरांची काम करण्याची पद्धत कशी चुकीची आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचे. त्यावेळचे शासक देखील याला पाठिंबा द्यायचे. त्यावेळी सन्मान मिळवण्यासाठी चिकित्सकांनी आपला पेशा किंवा व्यवसाय विज्ञानामध्ये बदलण्याचा निर्णय घेतला.

    त्यानंतर डॉक्टर देखील वैज्ञानिक बनण्याच्या तयारीला लागले. 1889 पासून डॉक्टरांनी सफेद कोट (White Coat) घालायला सुरुवात केली. आजचा आधुनिक सफेद कोड बनवण्याचं श्रेय कॅनडाचे डॉक्टर जॉर्ज आर्मस्ट्राँग (Doctor George Armstrong,Canada) यांना दिलं जातं. सफेद रंग शांतीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळेच रुग्णालयाच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये रुग्णांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात.

    हे वाचा-खरंच माणूस 150 वर्ष जगू शकतो?, संशोधनातून आली महत्त्वाची माहिती समोर

    ऑपरेशनच्या वेळी हिरव्या रंगाचे कपडे

    पण, जर डॉक्टर नेहमी सफद रंगाचा कोट घालतात तर, ऑपरेशन करताना हिरव्या रंगाचे कपडे का घालतात? हाही प्रश्न निर्माण होतो. सफेद रंगाचा कोट डॉक्टर रुग्णाला भेटताना घातला जातो. मात्र, हिरव्या रंगाचे कपडे ऑपरेशन थेटरमध्ये वापरले जातात. आधी डॉक्टर ऑपरेशनसाठी सुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे. मात्र 1914 साली डॉक्टरांनी हिरव्या रंगाचे कपडे घालायला सुरुवात केली. मात्र या दाव्यासाठी कोणाही ठोस पुरावा नाही.

    असं सांगितलं जातं कि ऑपरेशन करतावेळी रक्ताचा लाल रंग पाहून डॉक्टरांना मानसिक तणाव येतो. सतत हाच रंग डोळ्यासमोर असल्यामुळे स्ट्रेस वाढतो. अशा परिस्थितीत ऑपरेशन थेटरमध्ये हिरवा रंग पाहून डोळ्यांना आणि मनालाही शांती मिळते.

    First published:
    top videos

      Tags: Doctor contribution, Health Tips, Scientist