मराठी बातम्या /बातम्या /heatlh /पावसाळ्यात कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजाराची भीती; कशी घ्याल काळजी?

पावसाळ्यात कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजाराची भीती; कशी घ्याल काळजी?

वातावरणातला बदल सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण, याच बदलामुळे कितीतरी रोग (Diseases),जंतू (Germs) वाढणार असतात. त्यामुळे काळजीही (Care) तितकीच घ्यावी लागते.

वातावरणातला बदल सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण, याच बदलामुळे कितीतरी रोग (Diseases),जंतू (Germs) वाढणार असतात. त्यामुळे काळजीही (Care) तितकीच घ्यावी लागते.

वातावरणातला बदल सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण, याच बदलामुळे कितीतरी रोग (Diseases),जंतू (Germs) वाढणार असतात. त्यामुळे काळजीही (Care) तितकीच घ्यावी लागते.

दिल्ली, 1 जून :लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून (Summer) सुटका होणार म्हणून पावसाचे (Monsoon) वेध लागले की, सगळेच सुखावतात. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की, हवेत गारवा निर्माण होतो. हाच वातावरणातला बदल सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण, याच बदलामुळे कितीतरी रोग (Diseases),जंतू (Germs)वाढणार असतात. त्यामुळे काळजीही (Care) तितकीच घ्यावी लागते. त्यातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात (Increasing Corona) आपल्या कुटूंबाच्या काळजीची जबाबदारी वाढलेली आहे. एका संशोधनानुसार (Research) पावसाळ्यात वातावरण दमट (Humid)बनतं, इम्युनिटीही कमजोर (Weak Immunity) बनते. त्यामुळे कोरोना वाढण्याची भिती आहे. त्यातही ज्या भागात कोरोना (Corona)रुग्णांची जास्त आहे तिथे अधिक सावध रहायला हवं.

भिजू नका

काहीजणांना पावसात भिजायला आवडतं. काहीजण तर, पाऊस असला तरी बाहेर जातांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जायला टाळाटाळ करतात. पण, पावसात भिजल्याने व्हायरल इन्फेक्शन लवकर होतं. डोकं,अंग ओलं झाल्याने सर्दी लवकर होते. तापही येण्याची शक्यता असते. त्यामुळे भिजणं टाळावं. पावसात भिजल्यावर कपडे तात्काळ बदलावेत. पावसात भिजल्याने शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे घशात, नाकात विषाणू शिरतात.

हाय प्रोटीन डाएट

शरीराची झालेली झीज भरुन काढण्याचं काम प्रोटीन करतात. रोग प्रतिकारकशक्ती प्रोटीनमुळेच निर्माण होते तर,उर्जा आणि हार्मोन्सची निर्मिती देखील होते. त्यामुळे पावसाळ्यात प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. दुध,अंडी,मासे,मांसाहारी पदार्थ,विविध प्राकारच्या डाळी,सोयाबीन, शेंगदाणे,काजू यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं.

(HBD: जेनिफरला का म्हटलं जातं आशियातील सर्वात Sexiest वुमन?)

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. प्रोटीन, व्हिटॅमीन के, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम असतं. कॅन्सर, डायबिटीस, अॅनिमिया, संधिवात, नेत्रविकार, हृदयविकार, कोलेस्टरॉलच्या तक्रारी असतील तरही हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा. पावसाळ्यात या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्या नक्की खाव्यात. पालक, मेथी, शेपू,चवळी, कोथिंबीर, पुदिना, मुळा, राजगिरा भाजी, आंबट चुका, अळूची पानं, कढीपत्ता, मोहरीची पानं आहारात असावीत.

थंड पदार्थ टाळा

पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या काळात हलके पदार्थ खावेत. काहींना दही, ताक किंवा कोल्ड्रींक प्यायला आवडतं. पण, बदललेल्या वातावरणाचा विचार करता. या पदार्थांमुळे आजारपण लवकर येऊ शकतं.

(ऑफिसच्या कामामध्ये हे छोटे बदल करतील मोठं काम; थकवा, तणावापासून राहाल दूर)

बाहेरचे पदार्थ टाळा

पावसाळ्यातच नाही तर, नेहमीच घरचं ताज अन्न खावं. पण, काही लोक भूक लागली की, पाणीपुरी, भेळपूरी,वडे,समोसा या सारखे उघड्यावरचे पदार्थ किंवा पिझ्झा, बर्गर सारखे जंकफूड खातात. हे पदार्थ पचायला जड असतात. शिवाय उघड्यावरच्या पदार्थांवर कितीतरी प्रकारचे जंतू असण्याची शक्यता असते. पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढेल असं अन्न खावं.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात आपल्याला तहान लागत असल्याने पाणी पिण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. पण, पावसाळ्यात तापमान दमट झाल्यावर आपण कमी पाणी पितो. शरीराला भरपूर पाण्याच्या साठ्याची गरज असते. पावसाळ्यातही शक्यतो 2 ते 3 लिटर पाणी प्यावा. शरीर निरोगी राहण्यासठी जास्त पाणी पिणं आवश्क आहे. पावसळ्यात पाणी उकळून प्यावं.

( ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?)

मास्कचा वापर

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरणं आणि हात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे पावसळ्यातही बाहेर जाताना मास्क लावावा. बाहेर जाताना एक्सट्रा मास्क बरोबर ठेवा. पावसामुळे मास्क ओला किंवा दमट झाल्यास लगेच बदलावा. दमट ठिकाणी विषाणू वाढतात. नेहमी वाळलेला मास्क लावावा. चेहरा आणि हात पुसण्यासाठी टीश्यूपेपरचा वापर करावा.

घरात स्वच्छता

बाहेर ओलावा असल्याने घरात दमटपणा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात घरात स्वच्छता ठेवा. दमट वातावरण वाढू देऊ नका. त्यासाठी घरात व्हेंटीलेशन राहील याकडे लक्ष द्या. घरातील कुंड्या,फुलदाण्या, एअकंडिशनर,फ्रीज यांच्यात पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्या. पावसाळ्यात चिखल वाढतो. त्यामुले बाहेरून आल्यावर लगेच हातपाय स्वच्छ करा.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Immun, Monsoon