मराठी बातम्या /बातम्या /heatlh /बायकोला कोरोना झालाय पण तिच्या आहाराची काळजी कशी घेऊ समजत नाहीये; तुमच्यासाठी खास टीप्स

बायकोला कोरोना झालाय पण तिच्या आहाराची काळजी कशी घेऊ समजत नाहीये; तुमच्यासाठी खास टीप्स

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

पत्नी कोरोनाग्रस्त असेल आणि तिच्यावर घरीच उपचार सुरू असतील तर तिच्या काळजीची जबाबदारी पतीवर येऊन पडते. अशात कधीच किचनमध्ये न गेलेल्या पतीला पत्नी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिच्या आहार कसा असावा, असा प्रश्न पडतोच.

मुंबई, 01 मे : कोरानाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave Of Corona) अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं (Death due to Corneaआहे. कोरोनामुळे मृत्यूच्या दाढेतून परत आलेले कितीतरी लोक आपल्या जवळपास असतील. काहींनी आपले कुटुंबीय गमावलेत. कोरोना लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आपल्या कवेत घेतो आहे. अशात घरातच कोरोना रुग्ण असेल आणि घरीच त्याच्यावर उपचार सुरू असतील तर औषधांसह तुमचं प्रेम आणि त्यांची प्रेमाने केलेली सेावाही महत्त्वाची आहे. अशात ही कोरोनाग्रस्त व्यक्ती जर घरातील महिलाच असेल जी संपूर्ण कुटुंबाला सांभाळते, त्यांच्यासाठी राबते, तर आता तिच्यासाठी काहीतरी करण्याची ही वेळ आहे.

कोरोनामुळे पत्नी आजारी असेल तर, नेमकी कशी काळजी घ्यावी. हा प्रश्न साहजिकच पतींना पडत असेल. किचनमध्ये कधीच काम न केलेल्या पतीना तर, जेवण कसं बनवायचं (Food for corona patient) हाच प्रश्न पडलेला असेल. पण आपली नेहमीच काळजी घेणाऱ्या पत्नीला आजारातून बरं करण्यासाठी पतींनाच प्रयत्न करायचे आहेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, कोरोनामुक्त झालेल्या पत्नीच्या शरीरातील ताकत वाढवण्यासाठी (Corona patient diet) काय करावं. तर काळजी करू नका. अशा विवंचनेत असलेल्या पतीसाठी ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी दिलेल्या खास टिप्स उपयोगी पडलील.

भिजलेले बदाम

भिजलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदामामध्ये व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक हे घटक असतात. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते. कोरोनामधून रिकव्हर होणाऱ्या आपल्या पत्नीला रोज सकाळी भिजलेले बदाम खायला द्या. बदामातले प्रोटीन, फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं.

नाचणी डोसा

नाचणीमध्ये भरपूर मात्रेत कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, फायबर असे गुणकारी घटक असतात. नाचणी वातनाशकही आहे. हा डोसा बनण्यासही सोपा आहे. शिवाय चविष्ट असल्यामुळे आजारी माणूसही खाऊ शकतो. पत्नीला जेवण जात नसेल तर, ब्रेक फास्टमध्ये नाचणी डोसा नक्की बनवा. नाचणी डोसा डायबेटीक रुग्णही खाऊ शकतात.

(पालकांनो लक्ष द्या! मुलांना कोरोना झाल्यास काय करावं? केंद्राने दिला सल्ला)

गुळाचं सेवन

गूळ गुणाने उष्ण आहे. गूळ रक्त वाढीसाठी उत्तम पर्याय आहे. जेवणामध्ये गूळ खाणं ही प्राचीन पद्धत आहे. मात्र आता साखरेचं सेवन आपण जास्त करतो. पण रुग्णांसाठी आहारात गुळाचा समावेश करा, दुपारच्या जेवणात चपातीबरोबर तुप आणि गूळ नक्की द्या.

खिचडी

पत्नीसाठी रात्रीच्या जेवणात खिचडी बनवू शकता. खिचडी बनायला सोपी आणि पचायला हलकी असते. पौष्टीकता वाढवण्यासाठी यात वेगवेगळ्या डाळी वापरू शकतात. सोबत तुप खाल्यास पचनाला फायदा होईल. झोपही चांगली लागेल.

(राज्यात आणखी कठोर निर्बंध लावणार का? मुख्यमंत्री म्हणाले...)

हायड्रेशन महत्त्वाचं

कोरोना रुग्णाचं शरीर हायड्रेट ठेवणं महत्वाचं आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना जेवणाची चव लागत नाही. त्यामुळे पाणी आणि जेवण घ्यावसं वाटत नाही. त्यामुळे पत्नीसाठी घरगुती लिंबूपाणी, ताक नक्की बनवा थोड्याथोड्या वेळाने याचं सेवन केल्यास शरीरात पाण्याची पातळी चांगली राहील.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Coronavirus, Food, Health Tips, Lifestyle