मराठी बातम्या /बातम्या /heatlh /डायबिटीज करते नियंत्रित, कोलेस्ट्रॉलवरही आहे गुणकारी, 'या' पालेभाजीचे थक्क करणारे फायदे

डायबिटीज करते नियंत्रित, कोलेस्ट्रॉलवरही आहे गुणकारी, 'या' पालेभाजीचे थक्क करणारे फायदे

 संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

Diabetes: हिवाळ्यात भाजीबाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. मेथीच्या भाजी सुगंध दूरवर पसरलेला असतो. मेथीच्या पानांमध्ये अद्भुत शक्ती असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 3 फेब्रुवारी- हिवाळ्यात भाजीबाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. मेथीच्या भाजी सुगंध दूरवर पसरलेला असतो. मेथीच्या पानांमध्ये अद्भुत शक्ती असते. मेथी खाल्ल्याने रक्तातली साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करता येतं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात हेही सिद्ध झालं आहे, की मेथीमध्ये रक्तातली साखर अत्यंत कमी करण्याची क्षमता आहे. मेथीमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. त्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड, रायबोफ्लेबिन, कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी, बी 6 यांसारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

    मेथीमुळे ब्लड शुगर तर कमी होतेच, पण सांधेदुखीपासूनही आराम मिळू शकतो. मेथीची भाजी पराठा करून खाता येते. याशिवाय मेथीच्या पानांचा वापर सॅलड आणि सूपमध्येही करता येतो.

    (हे वाचा;ही 5 फळं संपवतील हाय कोलेस्टेरॉलची समस्या! हृदयही कायम राहील निरोगी )

    मेथीचे फायदे

    डायबेटीस नियंत्रण

    मेथीच्या पानांचं नियमित सेवन केल्यास, प्री-डायबेटिक स्टेजवर असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांमधला मधुमेह नाहीसा होऊ शकतो. एनसीबीआयच्या म्हणण्यानुसार, जर्नल ऑफ डायबेटीस अँड मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मेथी टाइप 2 मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते हे अभ्यासातून सिद्ध झालंय. अभ्यासानुसार, ज्यांना पूर्णपणे डायबेटीस नाही आणि ते प्री-डायबेटिक स्टेजमध्ये आहेत, त्यांनी मेथीच्या पानांचं सेवन केल्यास त्यांना डायबेटीस होण्याचा धोका खूपच कमी असतो. या अभ्यासात 30 ते 70 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. तीन वर्षांनी विश्लेषण केल्यावर असं आढळून आलं की मेथीचं सेवन न करणाऱ्यांमध्ये मेथी खाणाऱ्यांपेक्षा मधुमेहाची लक्षणं 4.2 पट जास्त होती.

    वाईट कोलेस्टेरॉल कमी करतं

    मेथी वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. मेथीचं सेवन करणाऱ्यांमध्ये फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (PPG) आणि पोस्टप्रॅन्डियल प्लाझ्मा ग्लुकोज (PPPG) कमी झालं. इतकंच नाही, तर त्यांच्या शरीरातलं लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलही कमी झालं. त्यामुळे रक्तदाबही कमी झाला. म्हणजेच मेथीच्या सेवनाने डायबेटीसचा धोका तर कमी होतोच, पण हृदयाशी संबंधित समस्याही कमी होतात.

    वजन कमी करण्यास उपयुक्त

    मेथीच्या पानांच्या सेवनानेही वजन नियंत्रित ठेवता येतं. मेथीच्या पानांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर्स असतात आणि त्यामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. यामुळेच मेथीच्या पानांचं सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवता येते. मेथी ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे. त्यामुळे शरीरातली दाहकतेची पातळीदेखील कमी होते.

    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Tips for diabetes