नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : गंभीर आजारांवरील उपचारासाठी औषधं (Medicine) खरेदी करणं बऱ्याचदा आर्थिकदृष्टया सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतं. त्यामुळे उपचारांसाठी अनेकांना आर्थिक मदत घ्यावी लागते तसंच कर्ज, उसनवारी करावी लागते. देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून वैद्यकीय उपचार आणि औषधांचा खर्च विशेष चर्चेत आला आहे. एकीकडे रुग्णाची स्थिती आणि दुसरीकडे औषधांचा खर्च अशा दुहेरी चिंतेत रुग्णांचे नातेवाईक असल्याचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळत आहे. या स्थितीत सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य दिलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून विविध आजारांवर उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या 39 प्रकारच्या औषधांच्या किमती (Rates) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच फायदा होईल.
कोरोना काळात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. विविध आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 39 प्रकारच्या औषधांची किमती कमी करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार ही 39 प्रकारची औषधं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं या 39 प्रकारच्या औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत (NLEM) केला आहे. यात कोरोना तसेच कॅन्सर (Cancer), डायबेटिस (Diabetes) आणि टीबीवर (TB) उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
काळजी घ्या ! कोरोनाच्या संकटात आता साथीच्या रोगाचं थैमान
यादीत आहे या औषधांचा समावेश
ज्या औषधांची किंमत कमी होणार आहे, त्यात कोरोनावर (Corona) उपचारात वापरल्या जाणार आयव्हरमेक्टिनचा (Ivermectin) समावेश आहे. तसेच कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी अॅझासिटीडाइन आणि फ्लूडाराबीन ही औषधं आणि टीबीवरील बिडेक्विअलिन आणि डेलामेनिड या औषधांचाही यात समावेश आहे. डायबेटिस आणि ब्लड प्रेशरवरील उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.
अशी आहे समाविष्ट औषधांची यादी
1)Amikacin (antibiotic)
2) Azacitidine (anti-cancer)
3) Bedaquiline (anti-TB)
4) Bendamustine Hydrochloride (anti-cancer)
5) Buprenorphine (opioid antagonists)
6)Buprenorphine+Naloxone (opioid antagonists)
7) Cefuroxime (antibiotic)
8) Dabigatran (anticoagulant)
9) Daclatasvir (antiviral)
10) Darunavir+Ritonavir (antiretroviral)
11) Delamanid (anti-TB)
12) Dolutegravir (antiretroviral)
13) Fludarabine (anti-cancer)
14) Fludrocortisone (corticosteroid)
15) Fulvestrant (anti-cancer)
16) Insulin Glargine (anti-diabetes)
17)Irinotecan HCL Trihydrate (anti-cancer)
18) Itraconazole (antifungal)
19) Ivermectin (anti-parasitic)
20) Lamivudine (antiretroviral)
21)Latanoprost (treat ocular hypertension)
22) Lenalidomide (anti-cancer)
23) Montelukast (anti-allergy)
24) Mupirocin (topical antibiotic)
25) Nicotine replacement therapy
26) Nitazoxanide (antibiotic)
27) Ormeloxifene (oral contraceptive)
28) Phenoxymethyl penicillin (antibiotic)
29) Procaine Benzylpenicillin (antibiotic)
30) Rotavirus vaccine
31) Secnidazole (anti-microbial)
32) Teneligliptin (anti-diabetes)
33) Tenofovir+Lamivudine+Dolutegravir (antiretroviral)
34) Tenofovir+Alafenamide Fumarate (TAF) (antiretroviral)
35) Terbinafine (antifungal)
36)Valganiclovir (antiviral)
ही औषधं यादीतून बाहेर
या यादीतून 16 औषधांना वगळण्यात आलं असल्यानं त्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. औषधांच्या वापरात होणारा बदल पाहिल्यानंतर त्यांना या यादीतून वगळण्यात येतं. तसेच ही यादी फार मोठी नसावी, हे देखील पाहावं लागतं. जी 16 औषधं या यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यात अँटिसेप्टिक, अँटिबायोटिक तसंच हायपरटेन्शनच्या (Hypertension) औषधांचा समावेश आहे. या यादीत समाविष्ट औषधांच्या किमती शासकीय सूत्रांच्या आधारे ठरवल्या जातात.
आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; 'या' वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर...
अशी आहे वगळलेल्या औषधांची यादी
1) Alteplase (clot buster), 2) Atenolol (anti-hypertension), 3)Bleaching Powder, Cetrimide (antiseptic),4) Erythromycin (antibiotic), 5)Ethinylestradiol+Norethisterone (birth control), 6)Ganciclovir (antiviral), 7)Lamivudine+Nevirapine+Stavudine (antiretroviral), 8) Leflunomide (antirheumatic), 9) Nicotinamide (Vitamin-B), 10) Pegylated interferon alfa 2a, 11) Pegylated interferon alfa 2b (antiviral), 12) Pentamidine (antifungal),13) Prilocaine+Lignocaine (anesthetic),14) Rifabutin (antibiotic), 15) Stavudine+Lamivudine (antiretroviral),16)Sucralfate (anti-ulcer).
आता एनएलईएम 2021 मध्ये 399 आवश्यक औषधांची नावे समाविष्ट आहेत. ही सध्या प्रत्यक्ष मूल्य नियंत्रणात आहेत. याचा अर्थ असा की रुग्णांना कमी किमतीत औषधं उपलब्ध व्हावी, यासाठी या यादीतील सर्व औषधांवर सरकारचा प्राईज कॅप असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.