Home /News /heatlh /

या सेलिब्रिटीनं सायकलवरून पूर्ण केला 1000 किमीचा पल्ला, मुंबईहून गाठलं उदयपूर

या सेलिब्रिटीनं सायकलवरून पूर्ण केला 1000 किमीचा पल्ला, मुंबईहून गाठलं उदयपूर

अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेस आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी त्याने नुकतीच एक सायकल यात्रा सुरु केली आहे.

    उदयपूर, 9 डिसेंबर: अभिनेता आणि फिटनेस आयकॉन (Actor and fitness icon) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिलिंद सोमणने (Milind Soman) मुंबई ते उदयपूर (Mumbai to Udaypur) हे तब्बल 1000 किलोमीटरचं अंतर सायकलवरून (1000 km on cycle) पूर्ण केलं आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी त्याने ही सायकल यात्रा काढली असून पुढे तो दिल्लीपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहे. निसर्ग, फिटनेस आणि आरोग्य या बाबींकडे सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मुंबईहून केली सुरुवात अभिनेता मिलिंद सोमणनं मुंबईहून या प्रवासाला सुरुवात केली आहे. तो दिल्लीपर्यंत सायकलवरून प्रवास करणार असून त्या प्रवासात तो पर्यावरणाचा संदेश देत आहे. सध्याच्या काळात व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं त्यानं म्हटलं आहे. सध्या यांत्रिकीकरण तर झालं आहेच, शिवाय आता डिजिटलायझेशनचा काळ आहे. आपण सध्या अशा काळात आहोत, जिथं मोठी यांत्रिक प्रगती झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना अंगमेहनतीची कामं करावी लागत नाहीत. त्यामुळे कुठल्याच प्रकारे शारीरिक हालचाली होत नसल्यामुळे फिटनेससाठी शारीरिक व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. जे नागरिक शारीरिक मेहनतीची कामं करत नाहीत, त्यांनी व्यायामही केला नाही, तर अनेक गंभीर आजार त्यांना जडण्याची शक्यता असते. त्यातील काही आजार हे एकदा जडल्यानंतर त्यातून कायमस्वरूपी सुटका करून घेणं अवघड जातं. त्यामुळे हे आजार जवळपासही फिरकू नयेत, यासाठी सर्व ती काळजी घेणं गरजेचं असल्याचं मिलिंद सोमण यानं म्हटलं आहे. हे वाचा- जमिनीवर झोपून तरुण करत होता फोटोशूट; समोरून सिंह आले आणि...; Shocking video पर्यावरण रक्षणाची गरज पर्यावरण ही सर्वांची गरज असून सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यानं म्हटलं आहे. प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी आपापलं योगदान द्यावं आणि पर्यावऱण रक्षणासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, याचा विचार करावा, असा सल्ला त्याने दिला आहे. भरपूर व्यायाम, उत्तम आहार, गाढ झोप आणि सकारात्मक विचार हीच फिटनेसची गुरुकिल्ली असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Fitness, Health, Star celebraties

    पुढील बातम्या