मराठी बातम्या /बातम्या /heatlh /अरे देवा! कोरोनानंतर आता H10N3 Bird Flu; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण

अरे देवा! कोरोनानंतर आता H10N3 Bird Flu; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण

माणसामध्ये पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा (Bird flu) H10N3 स्ट्रेन दिसून आला आहे.

माणसामध्ये पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा (Bird flu) H10N3 स्ट्रेन दिसून आला आहे.

माणसामध्ये पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा (Bird flu) H10N3 स्ट्रेन दिसून आला आहे.

बीजिंग, 01 जून: चीनमध्ये (China) उद्रेक झालेला कोरोनाव्हायरस सध्या जगभर धुमाकूळ घालतो आहे. त्याच चीनमध्ये आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे. देशात H10N3  बर्ड फ्लूचा (H10N3 bird flu) पहिला रुग्ण सापडला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (China’s National Health Commission) ही माहिती दिली आहे.  माणसामध्ये पहिल्यांदाच H10N3 हा व्हायरस दिसून आला आहे.

चीनच्या पूर्व प्रांतातील जियांग्सूमध्ये 41 वर्षीय व्यक्तीला H10N3 या बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची लागण झाली आहे. माणसामध्ये H10N3 आढळेला हा पहिला रुग्ण आहे. हा रुग्ण झेनजियांगचा (Zhenjiang) रहिवाशी आहे. त्याला ताप आला होता, शिवाय इतर लक्षणंही दिसत होती. 28 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 28 मे रोजी या व्यक्तीला H10N3 एव्हिएन इन्फ्लुएंझा व्हायरसची (H10N3 avian influenza) लागण झाल्याचं निदान झालं. अशी माहिती  NHC ने दिली आहे.

हे वाचा - Black Fungus ने 26 राज्यांत पसरले हातपाय; राज्यातील स्थिती भयानक

या व्यक्तीला या व्हायरसची लागण कशी झालेली याची माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. पण हा आजार फार गंभीर नसून व्यापक स्तरावर तो पसरण्याचा किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे, असंही एनएचसीने सांगितलं.  या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे, त्याला रुग्णालयातून डिस्चार्चही देण्यात आला आहे. दरम्यान असं आणखी कोणतंच प्रकरण सापडलेलं नाही.

हे वाचा - पावसाळ्यात कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजाराची भीती; कशी घ्याल काळजी?

एव्हिएन इन्फ्लुएंझाचे चीनमध्ये वेगवेगळे स्ट्रेन आहेत. त्यापैकी काही माणसांमध्ये पसरतात. विशेषतः कुक्कुटपालन व्यवसायाशी संबंधित असलेल्यांमध्ये हा आजार पसरतो. चीनमध्ये 2016-2017 साली बर्ड फ्ल्यूच्या H7N9 स्ट्रेननं थैमान घातलं होतं. तेव्हा जवळपास 300लोकांचा बळी गेला होता. दरम्यान चीनमध्ये नुकत्याच आढळलेल्या  H10N3 या इन्फेक्सनचे याआधी जगात एकाही प्रकरणाची नोंद नाही, असंही चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bird flu, China, Health, Serious diseases