सफरचंद खाणं हे आपल्या आरोग्यासाठी जरूर फायदेशीर असतं, परंतु त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आपल्या आरोग्याला त्याचा धोका होण्याची संभावना असते. त्यामुळे सफरचंद हे योग्य प्रमाणातच खायला हवं.
पचनसंस्थेवर दुष्परिणाम : सतत सफरचंद खाण्याची सवय ही आपल्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबरचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला पोटाचा विकारही होण्याची शक्यता असते.
रक्तदाबाची समस्या : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्याने आपल्याला रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त प्रमाणात सफरचंद खाणं धोक्याचं ठरू शकतं.
लठ्ठपणाची समस्या : जर तुम्ही सतत सफरचंद खात असाल तर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेडचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो.
दातांचे विकार : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्यामुळे आपले दात खराब होण्याची शक्यता जास्त असते. कारण सफरचंद हे अॅसिडिक असतं. त्यामुळे हे फळ योग्य प्रमाणातच खायला हवं.